Type Here to Get Search Results !

तरडगाव येथील आश्रम शाळेसाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून २ कोटी चा निधी मंजूर.

 सह्याद्री निर्भिड न्यूज

तरडगाव /वैभव जगताप 

तरडगाव येथील आश्रम शाळेसाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून २ कोटी  चा निधी मंजूर.


मौजे तरडगाव ता. फलटण जि. सातारा येथील महंत राहिरेकर महानुभव मठ देवस्थान ट्रस्ट येथील आश्रम शाळेमध्ये सभागृह व परिसर सुशोभीकरणासाठी  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर(महाराजसाहेब)यांच्या प्रयत्नातून २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग प्रादेशिक पर्यटन योजना सन २०२३-२४ या योजनेअंतर्गत मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (माजी सभापती विधान परिषद, महाराष्ट्र राज्य) यांच्या सूचनेनुसार व माननीय आमदार दीपकराव चव्हाण साहेब यांच्या पाठपुराव्याने *ब्रह्मविद्या पाठशाला मंहत राहेरकर महानुभाव मठ देवस्थान ट्रस्ट तरडगाव येथे आश्रम शाळेमध्ये सभागृह बांधणे व परिसर सुशोभीकरण करणे या कामासाठी दोन कोटी रुपये निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

सदर मंजुरी बद्दल श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण साहेब यांचे ग्रामपंचायत तरडगाव व ब्रह्मविद्या पाठशाला तरडगाव यांच्या वतीने खूप खूप आभार मानले.

Post a Comment

0 Comments