सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
अल्पवयीन मुलीचा लोणंद पोलीसांनी 3 तासात घेतला शोध.
दिनांक 12/3/2024 रोजी सकाळी 8.00 वाजताचे सुमारास पिडीत बालक वय 16 वर्षे 11 महीने
तरडगाव शिंदेमळा ता. फलटण जि. सातारा येथुन कॉलेजला जाते असे सांगुन घरातुन निघुन गेली ती परत कॉलेज
सुटल्यावर घरी आली नाही म्हणुन तिचे पालकांनी तिचा कॉलेजमध्ये, लोणंद गावात तसेच आजुबाजुच्या परीसरात
शोध घेतला परंतु ती मिळुन न आल्याने तिचे वडील फिर्यादी दिलीप भिमा शिंदे रा. सदर यांनी लोणंद पोलीस स्टेशन
येथे त्यांचे मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवुन नेले असलेबाबत फिर्याद दिल्याने लोणंद
पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर 109/2024 भादवि. 363 प्रमाणे दाखल असुन सदर गुन्हयाचा तपास पोउनि श्री
शिवाजी काटे यांचेकडे देण्यात आला आहे.
सदर गुन्हयाबाबत श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. ऑचल दलाल, अपर पोलीस
अधीक्षक सातारा, व मा. श्री. राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांना माहीती देऊन त्यांचे
मागदर्शनाखाली तपास सुरु केला. सपोनि सुशिल भोसले यांनी तांत्रीक माहीतीचे आधारे यातील पिडीत बालक ही
सासवड जि. पुणे येथे असल्याचे लक्षात आल्याने तात्काळ पोउनि शिवाजी काटे यांचे पथक तयार करुन त्यांचे
सोबत पोहवा 2260 सर्जेराव सुळ, पोकॉ. 2395 अभिजीत घनवट, यांना तपासाबाबत सुचना देऊन सासवड करीता
रवाना केले. त्यानंतर पुन्हा पिडीत बालक ही स्वारगेट नंतर पुणे रेल्वे स्टेशन येथे असल्याची माहीती प्राप्त झाली.
तांत्रीक माहीतच्या आधारे पिडीत बालक ही हाडपसर, पाटस मार्गे रेल्वेने निघाल्याची माहीती मिळाल्याने पुणे रेल्वे
स्टेशनचे आर.पी.एफ. चे अधिकारी पोउनि श्री बडे, श्री कायगुडे यांचेशी संपर्क केला असता सदर मार्गाने लखनै
एक्सप्रेस ही रेल्वे गेली असल्याचे लक्षात आले. सदर रेल्वेमधील टी. सी. श्री विनित वैरागर यांचेशी संपर्क करुन
पिडीत हिचा फोटो त्यांना पाठवुन ती रेल्वेमध्ये असल्याची खात्री झाल्यानंतर पिडीत हिस दौंड रेल्वेस्टेशन येथे
आर.पी.एफ. चे अधिकारी व महीला अंमलदार सपोफौ. बंडगर, पाटील, पोहवा जयभाये यांचे मदतीने ताब्यात घेतले
व पिडीत बालकाचे आई वडील हे दौंड रेल्वेस्टेशन येथे आल्याने पिडीत बालक हिस लोणंद पोलीस स्टेशन येथे
घेऊन येऊन तिचे महीला पोलीस अंमलदार यांचे मार्फत विचारपुस केली असता ती घरातुन रागाने निघुन गेली होती
असे सांगीतले आहे. पिडीत बालक हिस तिचे आई वडीलांचे ताब्यात देण्यात आली आहे. सदर पिडीत बालक हिस
गुन्हा दाखल झालेपासुन 3 तासात तपास करुन ताब्यात घेण्याचे लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार
यांना यश मिळाले आहे. त्याबाबत वरीष्ठांनी लोणंद पोलीस स्टेशनचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे
कौतुक केले आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. ऑचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा, व
मा. श्री. राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण, यांचे मार्गदर्शनाखाली श्री सुशिल बी. भोसले सहायक
पोलीस निरीक्षक, श्री. शिवाजी काटे पोलीस उपनिरीक्षक, श्री. सर्जेराव सुळ पोलीस हवालदार, श्री. अभिजीत घनवट
पोलीस कॉन्स्टेबल यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला होता.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments