सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण /वैभव जगताप
लोकसभा निवडणूक अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील सराईत दोन गुन्हेगार तडीपार.
लोकसभा निवडणुक अनुषंगाने मल्हारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अजय
सुनिल भिसे व सुरज अनिल पानस्कर यास पाटण व कराड तालुक्यातुन तडीपार
२/- सातारा जिल्ह्यामध्ये मल्हारपेठ व परिसरात सातत्याने शरिराविरुध्दचे गुन्हे करणारे १) अजय सुनिल
भिसे वय २४ वर्षे, रा.क्रांतीनगर नाडे नवारस्ता २) सुरज अनिल पानस्कर वय २८ वर्षे, रा. नारळवाडी ता. पाटण
जि.सातारा यांचेवर सातारा जिल्हात व बाहेरील जिल्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा
आणणे, घातक शस्त्राने हल्ला करणे, जबरी चोरी करणे, मा. जिल्हादंडाधीकारी साो सातारा यांनी जारी केलेल्या
जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाची अवज्ञा करणे, लोकसेवकाने रितसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा
करणेबाबतचे असे दोघांवर प्रत्येकी ४४ एकुण ०८ गुन्हे दाखल असल्याने मल्हारपेठ पोलीस ठाणेचे प्रभारी
अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी सदर इसमां विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६
प्रमाणे सातारा जिल्ह्यातुन तडीपार करणे बाबत प्रस्ताव उपविभागीय अधिकारी तथ उपविभागीय दंडाधिकारी पाटण
विभाग पाटण यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्रीमती सविता गर्जे, उपविभागीय पोलीस
अधिकारी पाटण विभाग पाटण यांनी केली होती.
यातील तडीपार इसमांवर दाखल असले गुन्ह्यांमध्ये त्याला अटक व कायदेशीर कारवाई करुनही तो
जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांचेवर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम झाला
नाही. अगर त्यांचे गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नसुन तो सातत्याने गुन्हे करीत होता. तसेच त्यांचेवर
कायद्याचा कोणताच धाक न राहिल्याने अशा गुन्हेगारांवर सर्वसामान्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी
होत होती.
वरील तडीपार इसमांस उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पाटण विभाग पाटण
मा.श्री. सुनिल गाडे यांचे समोर सुनावणी होवुन यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये पाटण व कराड
तालुक्यातुन ३ महिन्यांकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
नोव्हेंबर २०२२ पासुन मपोकाक ५५ प्रमाणे २२ उपद्रवी टोळ्यांमधील ७१ इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे
१९ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०२ इसमांना असे एकुण ९२ इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात
आली असुन भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांचे विरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा
प्रकारच्या कडक करवाया करणेत येणार आहेत.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सातारा श्री. समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती. आँचल
दलाल, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण विभाग पाटण श्रीमती सविता गर्जे, मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक
श्री. चेतन मनोज मछले यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि.श्री. पोटे, पो.हवा. गोरखनाथ साळुंखे, पोहवा. संतोष विटेकर,
पोकॉ. संभाजी जाधव, पो.कॉ. अमोल पवार, पोकॉ. शरद माने यांनी केला.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121


Post a Comment
0 Comments