सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे डि.पी चोरीचा प्रयत्न फसला.
शनिवार 16/03/2024 रोजी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील शेरेचीवाडी ता.फलटण, जिल्हा_ सातारा गावात रात्री 2:50 वाजता गावातील शेरेचीवाडी-वाठार निंबाळकर सरहद्दीवरील चिंतामणी डि.पी येथे 3-4 चोर चोरीच्या उद्देशाने आलेले आहेत आणि कटरच्या साह्याने डी.पी कट करून चोरीचा प्रयत्न करत आहेत,हे लक्षात येताच गावचे पोलीस पाटील श्री दयानंद नारायण चव्हाण घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600)सर्व गावाला व पोलीस स्टेशनला ही माहिती कळवली. त्यामुळे तात्काळ गावकरी तसेच फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री सुनील महाडिक साहेब यांच्या आदेशान्वये फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनची नाईट राउंडची गाडी दाखल झाले.*संपूर्ण गाव सतर्क झाले आणि तात्काळ घटनास्थळी आले हे लक्षात येताच चोर त्यांची 1 टू व्हीलर,1 5 Kg एलपीजी गॅस सिलेंडर, ऑक्सीजन सिलेंडर,कात्री,कटर,शिडी असे सर्व साहित्य जाग्यावर सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व पुढील अनर्थ टळला.
सदर ठिकाणी गॅस कटर व गॅस इत्यादी साहित्य मिळून आलेले आहे.
अजूनही काही ग्रामपंचायती ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी उदासीन आहेत.
प्रत्येक ग्रामपंचायतने सीसीटीव्ही कॅमेरे मुख्य रस्त्याला व ग्रामसुरक्षा यंत्रणा हे सुरक्षा विषयीचे मुख्य उपाय प्रत्येक गावात करावीत ही फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातर्फे सर्व ग्रामपंचायत यांना विनम्र आवाहन आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121


Post a Comment
0 Comments