Type Here to Get Search Results !

महाबळेश्वर नगरपालिका हद्दीत सुरु असलेल्या विकास कामांची चौकशी व तपास करण्याची आवश्यकता-पर्यावरण प्रेमी:श्री सुर्यकांत पांचाळ .

  सह्याद्री निर्भिड न्यूज

महाबळेश्वर/ चैतन्य दवे 

महाबळेश्वर नगरपालिका हद्दीत सुरु असलेल्या विकास कामांची चौकशी व तपास  करण्याची आवश्यकता-पर्यावरण प्रेमी:श्री सुर्यकांत पांचाळ .


दोषी आढळणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी भारतातील महाराष्ट्र राज्यात पश्चिम घाट सह्याद्रीच्या डोंगररांगात नैसर्गिक जैवविविधता लाभलेल्या दाट जंगलाने व्यापलेल्या  डोंगररांगात पारतंत्र्याच्या कालावधीत इंग्रजांनी मालकम पेठ या नावाने निर्माण करून घेतलेल्या सध्याचे  महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध असलेल्या  तसेच भारत केंद्र सरकारने २००१ साली एकुण पर्यावरणाच्या संरक्षणासाठी इको सेन्सिटिव्ह झोन आदेशित केलेल्या महाबळेश्वर सारख्या.थंड हवेच्या परिसरात सिमेंट काँक्रिटीकरणच्या माध्यमातून सिमेंट काँक्रिटचे रस्ते  निर्माण करून.तसेच पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी ब्रिटिशकालीन जांभ्या दगडाची पर्यावरण पूरक गटारे काढून टाकून. सिमेंट काँक्रिटचे गटारे व रस्ते निर्माण करून.महाबळेश्वर बाजारपेठेचे व आजूबाजूच्या परिसराचे शासनमान्य विद्रुपीकरण सुरू आहे की काय ?  महाबळेश्वर शहरात विकासाच्या नावाखाली सिमेंट काँक्रिटच्या कामांवर भर देऊन सुरू असलेल्या विकास कामांचा.ठेकेदार कंपनी कडून सुरू असलेला वेग व कामाच्या दर्जाबाबत शहरातील नागरिकांन कडून नाराजी व्यक्त केली जात असुन या बाबत विविध वर्तमान पत्रातून.वृत्त प्रसिद्ध करून वस्तू स्थिती व कामाच्या दुरावस्थेबदल आवाज उठवण्यात आला आहे. महाबळेश्वर शहरात विकासाच्या नावाखाली कित्येक करोड रुपये खर्च करून.सुरू असलेल्या कामांची व ठेकेदार कंपनीची शासकीय पातळीवर उच्च स्तरीय चौकशी.नेमुन कारवाई करण्याची मागणी नागरिकांन मधून केली जात आहे.

       महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे. या पर्यटन स्थळाचा जगभर नावलौकिक असल्यामुळे  माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाबळेश्वर बाजारपेठ त्याचप्रमाणे परिसरातील विविध भागाचा कायापालट करणारा  सुशोभिकरणाचा आराखडा तयार करण्याच्या सुचना केल्या होत्या. व या कामासाठी १०० कोटींचा निधी देखिल मंजुर केला. तत्कालिन पयर्टन मंत्री श्री आदित्य ठाकरे व  विद्यमान उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांनी उत्तम सुशोभिकरणाचा आराखडा तयार करुन घेउन आराखडयाची अंमजलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य शासनाने सातारा जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवली होती व आहे.

   

         राज्य शासनाकङुन नियोजित विकास आराखङ्याच्या कामासाठी काही प्रमाणात निधी  आगोदरच प्राप्त झाल्यामुळे  तो कसा तरी वापरुन संपवण्याच्या तत्वावर काम सुरू ठेवण्यात आले की काय?प्रत्यक्ष विकासाचे काम सुरू झाल्या नंतर तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह व पालिका प्रशासक सौ पल्लवी पाटील यांच्या बदल्या झाल्या. आणि सुशोभिकरण आराखङ्याची व प्रत्यक्ष सुरु केलेल्या कामाची फरफट सुरु झाली. आश्चर्य  म्हणजे ज्या ठेकेदार कंपनीने कधी  रस्त्यांची कामे केली नाही अशा ठेकेदार कंपनीकङुन रस्त्यांची कामे केली जात आहेत. व याच कंपनीने बाजार पेठेतील ब्रिटिशकालीन पर्यावरणास अनुकुल असणारी जांभ्या दगङाची उत्कृष्ट पध्दतीची  गटारे काढुन  त्याठिकाणी सिमेंट काॅंक्रिटच्या गटारांची कामे करताना दिसुन येत आहेत.

  

          या सिमेंट काॅंक्रिट पध्दतीच्या कामावर कंपनीने भर दिल्यामुळे पर्यावरणास हानीकारक ठरणारे विदृपीकरन करण्यास सुरुवात केल्याचे दिसुन येत आहे. 

            महाबळेश्वर शहराच्या मध्य वस्तीत ब्रिटिश काळापासुन  पारशी  समाजातील दिनशा पेटिट कुटुंबियांनी कोट्यावधी रुपये किमतीची मालमत्ता त्या काळात ग्रंथालय,वाचनालयासाठी देवु केली आहे.

   या मिळकतीतील मुळ इंग्रज कालिन जांभ्या दगङाची  इमारत आजही भक्कम पणे उभी आहे.ही इमारत ठेकेदार कंपनीकङुन संपुर्ण पाङुन पुनश्च बांधन्याचा खर्च आलेला नसताना देखिल या इमारतीच्या ङागङुजी व नुतनीकरणासाठी व मिळकत परिसरातील काही फेरबदलाची किरकोळ कामे करण्यासाठी अंदाजे चार ते पाच करोङ रुपयांचा भरमसाठ खर्च दाखवला गेला आहे. सदरची दिनशा पेटिट मिळकत इमारत हेरिटेज यादीत समाविष्ट आहे.महाबळेश्वर नगरपिलिकेने वेळोवेळी अशा सुंदर इमारतीला  लावलेल्या ङिस्टेंपरच्या रंगाचा थर घासुन काढुन इमारतीचे मुळ जांभ्या दगङाचे सौंदर्य मुळ स्वरुपात आणने आतील फरशी बदलणे,प्लास्टर आॅफ पॅरीसचे भिंतींना प्लास्टर करणे,रंगकाम करणे व जुणे पत्रे काढुन नविन पत्रे बदलने व इमारतीचे सागवानी दरवाजे खिङक्यांचा लावलेला आॅईल पेंट रंग घासुन काढुन सागवानी लाकङाचे मुळ सौंदर्य उजळवुन पाॅलिश काम करणे आतिल फर्निचरचे पाॅलिश चे काम करणे,लाकङी सिलिंग काम करुन पाॅलिश करणे,विद्युत काम करणे, बाहेरील मोकळ्या जागेत पेवरब्लाॅक पाथवे तयाकरणे,लाॅन तयार करणे तसेच कामगार निवास्थान  पाङुन त्याठिकाणी सौचालय इमारत बांधकाम करणे मिळकतीला मुळ स्थानिक जाभ्या दगङाचे मजबुत व सुरेख पध्दतीचे बांधकाम असताना देखिल ते काढुन टाकुन त्या ठीकाणी कोकणातील हलक्या दर्जाचा जांभा दगङ वापरुन संरक्षण भिंतीचे काम कंपनी कङुन करण्यात आले आहे.जुण्या संरक्षक भिंतीवरील पुर्विच्याच भिङाच्या धातुच्या ग्रील्स होत्या त्याच  पुर्वी प्रमाणे बसवण्यात आलेल्या आहेत.

सदरच्या मिळकतीच्या ३ते ४ ठिकाणी असलेल्या प्रवेश द्वारा चे मुळ असलेले आहे तेच ब्रिटीशकालीन भिङाच्या धातुचे दरवाजे पूर्वी प्रमाणे तेच बसवण्यात आले आहेत. इत्यादी कामांवर तसेच मुळ जांभ्या दगङाची इमारत पाङुन बांधलेली नसताना चार ते पाच करोङ रुपयांचा भरमसाठ खर्च येवु शकतो का? ही शंकास्पदबाब एखाद्या  सर्वसामान्य नारिकाला देखील समजण्यासाखी आहे . त्यामुळे दिनशा पेटीत ग्रंथालयाच्या मिळकतीत ३ ते ४ करोडो रूपयांचा अवास्तव खर्च दाखुन केलेले सुशोभीकरण करणाचे काम गैरवाजवी संशयास्पद असल्याचे दिसुन येत आहे.अशा संशयाच्या फेऱ्यात दिसुन येत असलेल्या दिनशा पेटीत ग्रंथालयाचे उद्घाटन मान्यवर महोदय करणार का ?

     महाबळेश्वर नगरपालिका हद्दीतील महाबळेश्वर तापोळा रस्त्यालगत भारत हाँटेल या मिळकतीच्या लगतचा महाबळेश्वर नगरपालिकेकडे हस्तांतर केलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मालमत्ता प्रसिद्ध ग्लेन औगल तलाव सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली नगरपालिकेने शासनाने दिलेले करोडो रूपयांचे निधी खर्च करून देखील तलावाचे काम अर्धवट स्थितीत व निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येतं आहे.तसेच अर्धवट स्थितीत काम केले तलावाची मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने छोट्या डबक्याचे स्वरूप ग्लेन औगल तलावाला आल्याचे दिसून येत आहे.

         तसेच महाबळेश्वर शहारातील पांचगणी महाबळेश्वर रस्ताया लगतचे नौकाविहार तसेच पाणीपुरवठ्याचे प्रमुख केंद्र असलेल्या वेण्णा तलावाच्या परिसरात देखील सुशोभीकरणासाठी करोडो रुपयाचा खर्च मंजूर करून प्रत्यक्षात ठेकेदार कंपनी कडून सुशोभीकरणाचे काम गेले एक वर्षापासून  सुरू करण्यात आले.परंतु काही प्रमाणात कोकणातील हलक्या दर्जाचा ढिसुळ दगड वापरून काम सुरू केले आहे.सदर दगड महाबळेश्वरच्या वातावरणात किती काळ तग धरू शकेल याबाबत शाश्वती देता येत नाही.वेण्णा परिसरात सुरू केलेले काम सध्या अर्धवट स्थितीत पडून असल्याचे दिसून येत आहे.


  ठेकेदार कंपनीने जेव्हा पासुन काम सुरू केले आहे तेव्हा पासुनच नियोजनाचा बटटया बोळ व विकास कामांना साङेसाती सुरू झाली आहे. कामाच्या दर्जा बाबत तर आता कोणी काहीच बोलत नाही.  मुळात मुळ आराखडा बदलुन अशा प्रकारे निधीचा अपव्यय करण्याची आवश्यक्ता नव्हती.       जर आराखङा राबवायचा होता तर, मुळ आराखङ्यातील नियोजना नुसार काम केले गेले पाहिजे होते.

  सध्या जे काम सुरू आहे त्या कामावर जनतेच्या पैशाचा शासनमान्य अपव्यय सुरू आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही ? राज्य शासनाकङुन महाबळेश्वर शहराच्या सुशोभिकरण विकासासाठी मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयांचा निधी देउन देखिल ठेकेदार कंपनीकङुन सुरु असलेल्या  विविध कामांचा ढिसाळपणा  व गलथान पणामुळे सुरु असलेल्या महाबळेश्वर नगरपालिका हद्दितील सुरू असलेली कोट्यवधी रूपयांची विकासकामेसंशयाच्या भोवर्यात सापडलेली असल्याने शासकीय उच्चस्तरीय सर्व आर्थिक केलेल्या खर्चाचे व कामांच्या दर्जाबाबत सखोल चौकशी तपास कार्यवाही नेमुन दोषी आढळणाऱ्या व्यक्ती वर फौजदारी स्वरूपाची व निलंबनाची कारवाई करून.  महाबळेश्वर पर्यटन स्थळाच्या केले जात असलेल्या नुकसानी बाबत कारवाई करण्याची आवश्यकता दिसून येत आहे.

   अतिशय महत्त्वाचे:-

  पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतावर नैसर्गिक जैव विविधतेच्या दृष्टीने  व्यापलेल्या गर्द झाङीच्या ङोंगरावर महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ इंग्रजांनी वसवले असुन त्या काळात  इंग्रजांनी विविध प्रेक्षनिय स्थळांची निर्मितीकेली.

  सध्या राज्यशासनाकङुन  महाबळेश्वर नगरपालिकेला सुशोभिकरण विकासासाठी शंभर कोटींचा निधी मंजुर झालेला असताना यामधुन देश, विदेशातुन दरवर्षी येणार्या लाखो पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध सुविधा निर्माण करण्यासाठी आलेल्या निधीचा विनियोग करुन निसर्गाला बाधा न पोहचवता विकास साधने गरजेचे असताना महाबळेश्वर सारख्या पर्यावरण दृष्ट्या संवेदनशिल म्हणुन भारत केंद्रसरकारने जाहिर केलेल्या पर्यटन स्थळाच्या महाबळेश्वर शहरात सिमेंट काॅंक्रिटचे रस्ते व गटारे करुन निसर्गाला हानी पोहोचवण्याचे काम महाबळेश्वर नगरपालिकेकङुन केले जात असल्याचे दिसुन येत आहे.हा सुरु असलेला सिमेंट काॅंक्रीटच्या कामावर भर देवून सुरु असलेला विकास पर्यावरणास व पर्यटन स्थळास हानीकारक व विद्रुपीकरण केले जात असल्याचे दिसुन येत आहे.

याची केंद्रीय उच्च स्तरीय पर्यावरण समितीने दखल घेणे आवश्यक आहे.तसेच शासनाच्या निधीतून करोडो रुपये खर्च करून महाबळेश्वर नगरपालिका हद्दीत सुशोभीकरणाच्या कामाच्या नावाखाली अनेक ठिकाणची कामे अर्धवट स्थितीत व दर्जाहीन असल्याचे दिसून येत असल्याने याची शासनस्तरावर सखोल चौकशी तपास नेमुन दोषीं आढळणाऱ्या व्यक्तींवर  निलंबन फौजदारी स्वरूपाची कारवाई ठेकेदारावर करणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे.वेळ प्रसंगी महाबळेश्वर नगरपालिका हद्दीत विकास कामांच्या नावाखाली निदर्शनास येत असलेले निकृष्ट दर्जाचे कामासंदर्भात शासकीय वरिष्ठ पातळीवर व तसेच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येतं आहे 

     महाबळेश्वर पर्यावरण प्रेमी व सामाजिक कार्यकर्ते सुर्यकांत पांचाळ.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments