सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
बोरगाव पोलिसांनी सोने चोरीचा गुन्हा २४ तासांत उघड कडून चोरीला गेलेले सर्व दागिने केले जप्त.
श्री समीर शेख, मा. पोलीस अधीक्षक सो सातारा, श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक
सातारा तसेच श्री राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग यांनी मालाविरुध्द दाखल
गुन्हयाची उकल करणेबाबत सुचना दिल्या होत्या. यादरम्यान कोहीनुर मल्टीपर्पज हॉल नागठाणे ता जि सातारा
येथून लग्न सुरु असताना वधू पक्षाच्या खोलीमधून सोन्याचा हार, सोन्याचे कानातील टॉप्स, सोन्याची ठूसी असे
एकत्रीत सुमारे 5 ताळे 3 ग्रॅम वजनाचे 3 लाख 54 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याबाबत
दिनांक 20/03/2024 रोजी बोरगांव पोलीस ठाणे गु र नं 152/2024 भा द स कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल
झाला होता. सपोनि श्री. रविंद्र तेलतुंबडे यांनी घटनेचे गांभीर्य विचारात घेवून सदर गुन्हयाचा तपास त्यांच्याकडे
घेतला व बोरगांव पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांना घडले गुन्ह्याचे संदर्भात योग्य त्या
सुचना देवुन गुन्हयाचा तपास सुरु केला. त्यांच्या तपासामध्ये व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या
माहितीमध्ये वधू व वधूच्या मैत्रिणींचा मेकअप करण्यासाठी आलेल्या मेकअप आर्टीस्ट महिलेवर संशय निर्माण
झाला. सपोनि श्री तेलतुंबडे यांनी पोलीस ठाणेकडील महिला पोलीस अंमलदारांकरवी सदर संशयित महिलेकडे
बुध्दी कौशल्याने तपास केला असता सदर मेकअप आर्टीस्ट महिलेनेच दागिने चोरल्याची कबूली
दिली. त्याप्रमाणे सपोनि श्री रविंद्र तेलतुंबडे यांनी महिलेकडून गुन्हयात चोरीला गेलेले सर्व 5 ताळे 3 ग्रॅम
वजनाचे 3 लाख 54 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केलेले आहेत.
सदर कारवाई ही श्री समीर शेख, मा.पोलीस अधीक्षक सो सातारा, श्रीमती आंचल दलाल, अपर
पोलीस अधीक्षक सातारा तसेच श्री राजीव नवले, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग यांच्या
सुचनेप्रमाणे करण्यात आली असून करवाईमध्ये सपोनि श्री रविंद्र तेलतुंबडे, पोलीस हवालदार दादा स्वामी,
पोलीस नाईक प्रशांत चव्हाण,पोलीस नाईक दिपककुमार मांडवे, केतन जाधव, विशाल जाधव व महिला पोलीस
अंमलदार प्रियांका पवार मपोहवा नम्रता जाधव,मोनिका निंबाळकर असे सहभागी झाले होते. सदर गुन्हयाचा
अधिक तपास सपोनि श्री रविंद्र तेलतुंबडे स्वत करीत आहेत.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments