Type Here to Get Search Results !

चारा टंचाई पार्श्वभूमीवर वैरण पिकांचे नियोजन.

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

चारा टंचाई पार्श्वभूमीवर वैरण पिकांचे नियोजन.



फलटण तालुक्यामध्ये चारा टंचाई पार्श्वभूमीवर पशुपालक यांना वैरण बियाणे वाटप करण्यात आलेले आहे. सदर बियाण्यामध्ये आफ्रिकन टाॅल, सुधारित मका बियाणे, शुगरग्रेज आदि वैरण बियाणे वाटप करण्यात आले आहे. तालुक्यासाठी एकूण २८५९७ किलो विविध बियाणे प्राप्त झालेले असून पशुवैद्यकीय संस्था मार्फत सदर बियाणे वाटप करण्यात येत आहे. प्रथम टप्प्यामध्ये २०४१ लाभार्थींना बियाणे वाटप करण्यात आलेले असून पाण्याच्या उपलब्धतेनुसार पेरणी झालेली आहे. अंदाजे १२०५ हेक्टर पेरणी क्षेत्र असणार आहे. आणि त्यापासून सुमारे ६०९०० मे.टन चारा उत्पादित होणार आहे. पशुपालक यांना आव्हान करणेत येते कि, पाण्याच्या उपलब्धतेनुसार वैरण बियाणे यांची लागवड करून चारा पिके घेण्यात यावी. आणि उपलब्ध झालेली वैरण यापासून मुरघास निर्मितीकडे लक्ष देवून चारा साठवणूक करण्यात यावी. जेणेकरून  दुष्काळ सारख्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून दुध उत्पादनाचे सातत्य टिकवून ठेवता येईल. वैरण बियाणे उपलब्धतेसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय संस्था यांचेशी संपर्क करावा.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments