Type Here to Get Search Results !

मेढा,(सातारा) हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्यास सातारा पोलीसांनी केले २ वर्षाकरिता तडीपार.

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

मेढा,(सातारा) हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्यास सातारा पोलीसांनी केले २ वर्षाकरिता तडीपार.





सातारा जिल्हयातील मेढा हद्दीतील शरिराविरुध्दचे तसेच अवैद्य दारु विक्री करणाऱ्या ०४ जणांच्या

टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार 

सातारा जिल्हयामध्ये मेढा पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) प्रेम ऊर्फ बबलु विलास

पार्टे, वय २४ वर्षे, २) गणेश विष्णु शिंदे, वय २३ वर्षे, ३) सनि विकास कासुर्डे, वय २२ वर्षे, ४) राहुल रामा कुऱ्हाडे, वय

२५ वर्षे, सर्व रा. मेढा, ता जावली जि. सातारा,यांचेवर गर्दीमारामारी करुन खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत पोचवणे, अवैद्य

दारुची चोरटी विक्री करणे असे गंभीर गुन्हे दाखल असल्याने मेढा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. संतोष

तासगांवकर, सहा.पोलीस निरीक्षक, मेढा पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे

पुर्ण सातारा जिल्हयातुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे

सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री. बी. वाय. भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी केली

होती.

सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही

त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. ते मेढा परिसरात सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर

कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे मेढा तसेच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठया प्रमाणावर या टोळीचा

उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.

वरील टोळीस मा.समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होवुन त्यांनी

महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पुर्ण सातारा जिल्हयातुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

नोव्हेंबर २०२२ पासुन मपोकाक ५५ प्रमाणे २३ उपद्रवी टोळयांमधील ७५ इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे १९

इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०२ इसमांना असे एकुण ९६ इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली

असुन भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक

कारवाया करणेत येणार आहेत.

या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक

यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्रेणी पो

तानाजी माने पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो. कॉ. केतन शिंदे, म.पो. कॉ. अनुराधा सणस, मेढा पोलीस ठाणेचे पो.ना.

महेश शिंदे यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल-8007852121

Post a Comment

0 Comments