सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
पै. नानासाहेब मदने यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील युवा नेतृत्व पैलवान नानासाहेब मदने यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस भवन बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात बारामती टेक्सटाईल पार्क च्या अध्यक्षा तसेच भावी खासदार सौ. सुनेत्रा वहिनी पवार पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.विश्वासराव देवकाते उर्फ नाना पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष श्री.संभाजी नाना होळकर* यांच्या हस्ते पैलवान नानासाहेब मदने यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र समारंभपूर्वक देण्यात आले.
पैलवान नानासाहेब मदने यांचा पुणे जिल्ह्यातील विविध संघटना आणि पदाधिकाऱ्यांशी असलेला संपर्क, यापूर्वी तरुणांसाठी केलेले सामाजिक कार्य, जिल्हास्तरीय दहीहंडी उत्सव कार्यक्रम, वृक्षारोपण, कोरोना काळात नागरीकांना केलेले सहकार्य, मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेले सामाजिक उपक्रम, जिल्ह्यातील युवकांचे संघटन अशा सामाजिक कार्याची दखल घेऊन पक्षाच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष पदाची निवड केली आहे.
निवडीनंतर पैलवान नानासाहेब मदने यांनी सांगितले की यापुढे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. समाज उपयोगी उपक्रम राबवून नागरिकांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी विश्वासाची भावना निर्माण करण्यात येईल, दादांचे कार्य सर्वपरिचित आहेत परंतु आम्ही यापुढे याला गती देणार आहोत. सर्वसामान्य नागरिकांचा विकास हाच आमचा ध्यास यानुसार काम केली जाईल असे पैलवान नानासाहेब मदने यांनी सांगितले.
जिल्ह्यातील विविध भागातून मदने यांचा निवडीनंतर सत्कार करण्यात येत आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments