Type Here to Get Search Results !

श्री. क्षेत्र महाबळेश्वर येथे महाशिवरात्र निमित्त भाविकांची अलोट गर्दी.

सह्याद्री निर्भिड न्यूज

महाबळेश्वर/चैतन्य दवे

श्री. क्षेत्र महाबळेश्वर येथे महाशिवरात्र निमित्त भाविकांची अलोट गर्दी


.

श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध जिल्ह्यातून भाविक यात्रेसाठी येतात.क्षेत्र महाबळेश्वर येथे पुरातन असे शिवमंदिर आहे .सात नद्यांचा उगम स्थान देखील आहे. यामध्ये प्रामुख्याने कृष्ण,कोयना ,सावित्री गावित्री, वेण्णा.अश्या ५ तर भागीरथी आणि सरस्वती अशा गुप्त २ नद्या आहेत .एकूण सात नद्या इथे उगम पावतात.श्री महाबळेश्वर ,श्री अतिबळेश्वर,कृष्णबाई मंदिर,पंचगंगा मंदिर व अनेक छोटे मोठे मंदिर इथे आहेत.क्षेत्र महाबळेश्वर येथे राजामाता जिजाऊ माँ साहेब भोसले यांची पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी  सुवर्ण तुलना क्षेत्र महाबळेश्वर येथे केली होती.राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी क्षेत्र महाबळेश्वर मध्ये दर्शन घेण्यासाठी दाखल झाले होते. या यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांच्याकडून बसेस सोडण्यात आलेल्या होत्या. या सोडण्यात आलेल्या बसेसच्या दिवसभरातून 200 हून अधिक फेऱ्या झाल्या होत्या. लाखाच्या घरात अधिक भाविक यात्रेमध्ये सहभागी झाले होते

दुपारच्या वेळेस सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख सपत्नीक दर्शन घेतले. व तहसीलदार तेजस्विनी खोचरे पाटील यांनी श्री स्वयंभू महाबळेश्वराचे दर्शन घेतले.वाहतुक कोंडी वर महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व ट्राफिक वॉर्डन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायत हद्दीमध्ये मंदिराच्या सभवतालच्या परिसरामध्ये अनिरुद्धज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट या,सेवाभावी संस्थेकडून भाविकांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी, संपूर्ण सातारा जिल्ह्यातून स्वयंसेवक ७० हून अधिक उपस्थित होते. सह्याद्री ट्रेकर्स सर्च अँड रेस्क्यू टीमचे 10 जवान सुद्धा आपली सेवा बजावत होते.

महाबळेश्वर नगरपालिका यांच्यामार्फत आपत्कालीन व्यवस्था सुद्धा पुरवण्यात आल्या होत्या यामध्ये अग्नीशामक  रुग्णवाहिका या सुद्धा मंदिराचा पार्किंग मध्ये उभ्या होत्या. सह्याद्री ट्रेकर्सचे अध्यक्ष संजय पार्टी (सर)स्वतः मंदिरामध्ये भाविकांना मार्गदर्शन करत होते विविध दानशूर व्यक्तींकडून केळी, लाडू व खिचडी यांसारखे उपवासाचे खाद्यपदार्थ हे भाविकांना वाटण्यात आले . महाबळेश्वर चे युवा नेते रोहित ढेबे यांनी सुद्धा, आपल्या परीने अन्नदानाचे पुण्य आपल्या मित्र मंडळांकडून आपल्या पदरात घेतले.

प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्यामार्फत क्षेत्र महाबळेश्वर येथे ,जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात आकर्षक असे बारा ज्योतिर्लिंग यांच्या १२  प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. विविध प्रकारच्या दुकानांनी व खरेदी करायला ग्राहकांनी परिसर गजबजला होता 

चौकट:- अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ही संस्था मोफत मध्ये सर्व भाविकांना सेवा देतात. यात्रेच्या ४५ दिवस आधी यात्रेची माहिती दिल्यावर संस्थेचे स्वयंसेवक स्वतः येऊन  पाहणी करतात.मग ठरवतात की या यात्रेला सेवा पुरवायची का? नाही याचा सर्वस्वी निर्णय संस्था घेते.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments