Type Here to Get Search Results !

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेत मुलींची बाजी

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेत मुलींची बाजी.




सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने जलजीवन मिशन योजनेची जनजागृती करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत  निबंध, चित्रकला, वकतृत्व व लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा या गावस्तर, शालेय व महाविद्यालयीन स्तर, तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत मुलींनी बाजी मारली असून यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले.


जलजीवन मिशनच्या प्रचार प्रसिद्धी करिता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्पर्धेतील विद्यार्थ्याचे गुणाकंन हे तज्ञ शिक्षक, प्राध्यापक यांच्या कडुन करण्यात आले.प्रा. वाय.टी.खरात, प्रा. डॉ. संजय कुमार सरगडे, प्रा. एन एस.शेडगे. एन.एस. सुतार, एस.एन. कुंभार, सौ. एस. एस.कदम,  एम एम बागल यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विजयी झालेल्या स्पर्धकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन व प्रकल्प संचालक संतोष हराळे यांनी अभिनंदन केले आहे. निकाल पुढीलप्रमाणे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्राथमिक गट (इयत्ता 1 ली ते इयत्ता 7 वी) प्रथम क्रमांक - आयेशा मोमीन (नॅशनल पब्लिकस्कूल वाई), व्दितीय क्रमांक - समर्थ पवार (न्यू.इंग्लिश स्कुल सातारा), तृतीय क्रमांक विभागून - कल्याणी आग्रे (माने विद्यालय पाटण) व सनथ जाधव (श्रीपतराव पाटील हायस्कूल सातारा), जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा माध्यमिक गट (इयत्ता 8 ली ते इयत्ता 10 वी): प्रथम क्रमांक- सानिका फडतरे (न्यू.इंग्लिश स्कूल सातारा), व्दितीय क्रमांक - अवधूत देशमाने (अनंत इंग्लिश स्कूल सातारा), तृतीय क्रमांक विभागून - साक्षी तांबे (श्री. शिवाजी विद्यालय डिस्कळ) व सई दडस (परशुराम विद्यालय दहिवडी), जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा प्राथमिक गट (इयत्ता 1 ली ते इयत्ता 7 वी): प्रथम क्रमांक - राजनंदिनी माने (छ. शिवाजी हायस्कूल वडूज), व्दितीय क्रमांक - शौर्या निकम (जि.प.शाळा नांदवळ), तृतीय क्रमांक - प्राची शेळके (माने विद्यालय पाटण), जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा माध्यमिक गट (इयत्ता 8 ली ते इयत्ता 10 वी): प्रथम क्रमांक - सई फडतरे (छ. शिवाजी हायस्कूल वडूज), व्दितीय क्रमांक - अपूर्वा ननावरे (जि.प.शाळा नांदवळ), तृतीय क्रमांक - समिक्षा हिंगमिरे ( अहिरेश्वर विद्यालय अहिरे), जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा जुनिअर गट : प्रथम क्रमांक विभागून  समृध्दी राजपुरे (श्रीम.कांताबेन मेहता ज्यु. कॉ. पाचगणी) व श्रेया शिंदे (भारत माता विद्यालय व ज्यु.कॉ.मायणी), व्दितीय क्रमांक ‍विभागून दामिनी पाटील (मुधोजी ज्युनिअर कॉलेज फलटण) व सायुरी सणस (किसनवीर महाविद्यालय वाई), तृतीय क्रमांक विभागून प्रगती बांदल (वेण्णा ज्युनिअर कॉलेज मेढा) व सिध्दी ढमाळ (राजेंद्र महाविद्यालय खंडाळा), जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा सिनिअर गटात प्रथम क्रमांक विभागून अर्थव खरे (किसनवीर महाविद्यालय वाई) व प्राची कांबळे (शासकीय फार्मसी कॉलेज. कराड), व्दितीय क्रमांक विभागून ज्ञानेश्वरी बिबे (नामदेवराव सुयवंशी महाविद्यालय.फलटण) व स्वप्नाली गोळे (भिमराव शिंदे महाविद्यालय वाई), तृतीय क्रमांक विभागून वैभवी सुर्वे (आ.शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा) व

ऋतुजा जाधव (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवड), जिल्हास्तरीय लघुपट निर्मिती स्पर्धेत प्रथम क्रमांक जमीर आतार (समर्थ मंदिर सातारा), व्दितीय क्रमांक विभागून 

 निनाद यादव ( मु.पो.अतित) व 

 रोहित आवळे (जुनी एम.आय.डी.सी. सातारा), तृतीय क्रमांक विभागून              धैर्यशील उत्तेकर (पिरवाडी सातारा) व 

शिवाजी जाधव ( सेंट झेवीअर्स हायस्कुल पाचगणी).


स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

विद्यार्थ्यांच्या मध्ये आत्मविश्वास वृद्धीसाठी वक्तृत्व कला, निंबंध लेखण, चित्र रेखाटणे असे कला गुण उपयुक्त असून विद्यार्थी दशेतच तिच्यामध्ये वृद्धी होते. जलजीवन मिशनच्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्याच्या कलागुणास निश्चितच वाव मिळाला आहे. विद्यार्थ्यानी या पुढे जलदुत म्हणुन  जलसंधारण.छतावरील पाणी संकलन. पाण्याचे महत्व या विषयी लोकांमध्ये जनजागृती करावी.  स्पर्धेमधील सर्व सहभागी व यशस्वी  विद्यार्थ्यांचे व स्पर्धकांचे  अभिनंदन.

 -याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद सातारा.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments