सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ वैभव जगताप
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने साखरवाडी विद्यालयातील सर्व शिक्षिकांचा सन्मान.
8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साखरवाडी शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभागातील सर्व शिक्षिका भगिनींना साखरवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच माननीय सौ रेखाताई जाधव यांचे शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय श्री तुळशीदास बागडे , ज्येष्ठ शिक्षक श्री संजय बोडरे, विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री हरिदास सावंत , सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. श्री बागडे व सावंत सरांनी आपल्या मनोगतातून महिला दिनाचे महत्त्व विषद करून सर्व भगिनींना शुभेच्छा दिल्या.आभार श्री भिमकांत कुंभार यांनी मानले.विद्यालयातील कला शिक्षक श्री रासकर सर तसेच श्री गावित सर यांनी या कार्यक्रमासाठी बहुमोल सहकार्य केले.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments