Type Here to Get Search Results !

घरफोडी व चोरी करणा-या आरोपींना पांचगणी पोलीसांनी केले जेरबंद.

सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/ वैभव जगताप 

 घरफोडी व चोरी करणा-या आरोपींना पांचगणी पोलीसांनी केले जेरबंद.


पांचगणी पोलीस ठाणे हद्दीत नविन बांधकाम चालु असलेल्या व बंद बंगल्यांचे चालु फिटींगमधिल वायर

काढुन घेणे बाबत घरफोडी व चोरी सारखे गुन्हे दाखल झाले होते. सदर गुन्हयाचे तपासाबाबत मा.पोलीस

अधीक्षक सो सातारा समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक सो सातारा आंचल दलाल मॅडम, मा. उपविभागिय

पोलीस अधिकारी वाई विभाग वाई, श्री. बाळासाहेब भालचीम सो यांनी दिले सुचनाप्रमाणे व केलेल्या

मार्गदर्शनावरुन पांचगणी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक व तपासी

पोलीस अंमलदार ६४४ पवार व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार पोना / ९६२ शिंदे व पोकॉ/७६२

लोखंडे यांनी सदर घडणा-या गुन्हयाबाबत गोपनीय खब-यामार्फत माहीती मिळवुन मिळाले माहीतीच्या आधारे

यातील आरोपी निष्पन्न केले आहेत.

आरोपींची नाव

१) ओकार संतोष राजपुरे

२) विषाल सुरेश आडागळे

३) सागर निलेश वैराट

४) दिपक नथुराम गोळे

५) रुषी वाडकर (पाहीजे आरोपी)

सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक साो सातारा समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक सो

सातारा आंचल दलाल मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई, श्री. बाळासाहेब भालचीम सो

यांचे मार्गदर्शनाखाली पांचगणी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक व

तपासी पोलीस अंमलदार पोहवा / ६४४ पवार यांनी आरोपी यांचेकडे चौकशी करुन चोरीस गेलेला माल हस्तगत

केला आहे. तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी पोउनि ननवरे, पोहवा / ६४४ पवार, पोना/९६२ शिंदे व

पोकॉ/७६२ लोखंडे यांनी सदर कारवाईमध्ये सहभाग घेतला असुन त्यांनी केले चांगले कामगिरीबाबत त्यांचे

सर्वांचे मा. पोलीस अधीक्षक सो सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments