सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
कराड शहर डीबी पथकाने केले तडीपार इसमास जेरबंद
श्री. समीर शेख सो. पोलीस अधीक्षक सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल सो. सातारा, मा.
उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. यांनी आगामी निवडणुका पाहता कराड शहर
पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. के. एन. पाटील सो. यांना कराड शहरात तडीपार इसमांची माहिती काढुन
त्यांचेवर तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषगाने वपोनि श्री के. एन. पाटील यांनी पोलीस उप
निरीक्षक पंतग पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक कुलदिप
कोळी,संतोष पाडळे, पो.कॉ. अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील यांची सदर कामगीरी साठी एक
विशेष पथक म्हणुन रचना केली होती.
दिनांक 19/03/02023 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील सो. यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदार मार्फत
बातमी प्राप्त झाली की, बिरोबा मंदिर जखिनवाडी ता. कराड येथे 2 वर्षाकरीता तडीपार असलेला इसम नामे- पृथ्वीराज
बळवंत येडगे हा त्या ठिकाणी आला आहे त्याबाबत त्यांनी पोलीस उप निरीक्षक श्री पतंग पाटील व पथकास माहिती देवुन
तात्काळ कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार सदर पथकाने बिरोबा मंदिर जखिनवाडी ता. कराड सापळा रचुन मिळाले
बातमी प्रमाणे तडीपार इसम नामे- पृथ्वीराज बळवंत येडगे वय 29 वर्षे यास जागीच पकडले त्याबाबत कराड शहर पोलीस
ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री के. एन. पाटील सो. यांचे
मार्गदर्शनाखाली पो.हवा. अमित पवार व डी. बी. टिम करीत आहेत.
तडीपार आरोपी :- पृथ्वीराज बळवंत येडगे वय - 29 वर्षे रा. जखिनवाडी ता. कराड जि. सातारा
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल सो.
सातारा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक
के.एन.पाटील सो.कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक पतंग
पाटील, पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पो. कॉ. अमोल
देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील यांनी केलेली आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments