सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
उंब्रज पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोटर सायकल चोरटा जेरबंद व २०,००० /- रुपयेचा मुद्देमाल हस्तगत.
दिनांक ०६/०३/२०२४ रोजी सकाळी ०७.०० वा. ते सायंकाळी ०४.०० वा. दरम्यान फिर्यादी
नामे रामचंद्र मारुती यादव रा. विहे ता. पाटण जि. सातारा यांचे मालकीची हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटर
सायकल क्र. MH 11 AR 3803 हि त्यांचा मुलगा अवधुत रामचंद्र यादव यांनी उंब्रज ता. कराड गावचे
हद्दीतून आय. डी. बी. बाय बॅकेचे समोरील असले मोकळ्या जागेत पार्क करुन त्यानंतर ते कंपनीकडील
गाडी मधुन कामासाठी बाहेरगावी गेले होते. कामावरुन परत आलेवर त्यांना सदर ठिकाणी त्यांची
मोटरसायकल मिळन न आल्याने त्यांची मोटर सायकल ही कुणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक
फायद्या करीता त्यांचे संमतीशीवाय चोरुन नेहली बाबत उंब्रज पोलीस स्टेशनला गु. र. नं. १४३ /२०२४
भादंविसं कलम ३७९ प्रमाणे दाखल करणेत आलेला होता.
सदर तक्रार दाखल झालेनंतर श्री. रविंद्र भोरे सहा. पोलीस निरीक्षक उंब्रज यांनी पोलीस स्टेशन
मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, पोलीस उपनिरीक्षक
रमेश ठाणेकर, पो. हवा. ब. नं. ५४५ सोरटे, पो. हवा. १३२१ धुमाळ, पो. हवा. ८५० भोसले, पो. कॉ. २८
पाटील, पो. कॉ. २३६६ कोळी होमगार्ड समीर शेख, मिलींद बैले यांना उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग
करुन अज्ञात आरोपीचा व मोटर सायकलचा शोध घेणे बाबत यांना सुचना दिल्या त्याप्रमाणे पोलीस स्टाफ हे
उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना मौजे उंब्रज ता. कराड गावचे हद्दीत उंब्रज ते हिंगनोळे
जाणारे रोडवर असले खिडकीड नावचे ओढ्याचे शेजारी एक इसम संशयीत रित्या मोटर सायकल घेवून ऊभा
होता. त्यावेळी त्यास पोलीसांची चाहूल लागताच तो पळून जाणेचे तयारीत असताना त्यास पकडून त्यांचे नाव
गाव विचारता त्याने त्यांचे नाव निखील सुरेश सपकाळ वय २३ वर्षे रा. निगडी ( मसूर ) ता. कराड जि.
सातारा असे असलेचे सांगितले त्यास त्याचे जवळ असले मोटर सायकल क्र. MH 11 AR 3803 बाबत
विचारपुस केली असता त्याने सांगितले की, सदरची मोटर सायकल ही मी उंब्रज गावातील आय. डी. बी.
बाय बॅकेचे समोरुन चोरलेली आहे. अशी कबुली दिलेने त्यास ताब्यात घेवून उंब्रज पोलीस स्टेशन मध्ये आणून
सदर मोटर सायकल बाबत खात्री करुन त्यास सदर गुन्ह्यचे तपास कामी अटक करणेत आली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक साो, सातारा श्री. समीर शेख साहेब, मा. अप्पर पोलीस
अधिक्षक साो, आचंल दलाल मॅडम, मा, उपविभागीय पोलीस अधिकारी साो, श्री. अमोल ठाकुर साहेब यांचे
मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, पोलीस
उपनिरीक्षक रमेश ठाणेकर, पो. हवा. प्रशांत सोरटे, पो. हवा. संजय धुमाळ, पो. हवा. दिनेश भोसले, पो. कॉ.
हेमंत पाटील, पो. कॉ. रविराज कोळी व होमगार्ड समीर शेख, मिलींद बैले यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा
तपास पो. हवा. प्रशांत सोरटे हे करीत आहेत.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments