सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
जर्शी गाई चोरी करणा-या आरोपींना लोणंद पोलीसांनी केले जेरबंद
लोणंद पोलीस ठाणे हददीत जर्शी गाई चोरी सारखे गुन्हे दाखल झाले होते. सदर गुन्हयाचे
तपासाबाबत मा. पोलीस अधीक्षक साो सातारा समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साो. आंचल
दलाल मॅडम, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस सो, यांनी सुचना दिल्या होत्या. त्या
प्रमाणे वरीष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरुन लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री. सुशिल भोसले, सहाय्यक
पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर घडणा-या गुन्हयांबाबत गोपणीय
खब-यांमार्फत माहीती मिळवुन मिळाले माहीतीचे आधारे यातील आरोपी निष्पन्न केले.
दिनांक १४/०३/२०२४ रोजी यातील आरोपी हा मौजे बीबी ता. फलटण परीसरात फिरत
असल्याची खात्रीशीर माहीती मिळताच मा. वरीष्ठ अधिकारी सो. यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुशिल
भोसले, सहायक पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका आरोपींस ताब्यात घेवुन पोलीस
स्टेशनला आणले. त्यांचेकडे अधिक विचारपुस केली असता त्यांने व त्याचे एका साथीदाराने मिळुन
लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील घाडगेवाडी ता. फलटण येथील गाई चोरीचे एकुण ३ गुन्हे केल्याची
कबुली दिली आहे. यातील आरोपी क्रमांक १) कल्याण तानाजी येळे वय २४ वर्षे रा. घाडगेवाडी ता. फलटण जि. सातारा व २) सचिन साहेबराव येळे वय ३७ वर्षे येळेवस्ती, घाडगेवाडी ता. फलटण जि. सातारा या दोन्ही आरोपीस ताब्यात घेवुन त्याचेकडुन चोरी केलेल्या दोन गाई एकुण १,०८,०००/-
रुपये व गुन्हयात वापरलेले चारचाकी वाहन रुपये ४,२०,०००/- किंमतीचे असा एकुण ५,२८,०००/-
किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा. संतोष नाळे, सर्जेराव सुळ, विठ्ठल काळे, केतन लाळगे तसेच पोहवा.
चंद्रकांत काकडे,सिध्देश्वर वाघमोडे यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असुन मा. पोलीस अधिक्षक
सो सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
.jpg)
Post a Comment
0 Comments