Type Here to Get Search Results !

निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपणे व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/ वैभव जगताप 

निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपणे व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी.



सातारा दि.7: निवडणूक प्रक्रियेमध्ये काम करणा-या सर्व यंत्रणांचे कामकाज परस्पर समन्वयाने व उचित पध्दतीने पार पडल्यास जिल्हयातील निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपणे व सुयोग्य पध्दतीने होईल. त्यासाठी सर्वांनी नियमाप्रमाणे व पारदर्शकपणे जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. निवडणूक कर्तव्याविषयी सर्व यंत्रणांमध्ये जाणीव-जागृती निर्माण करण्यासाठी सदर प्रशिक्षण जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करणेत आले.


जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांचे अध्यक्षतेखाली लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने आज स्व. यशवंतराव चव्हाण, बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद सातारा येथे प्रशिक्षण आयोजित करणेत आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  या प्रशिक्षणास अतिरिक्त पोलीस अधिक्षक, अप्पर जिल्हाधिकारी सातारा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सातारा, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ESMS प्रणालीमध्ये काम करणारे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी, पोलीस उपअधिक्षक (गृह), एलसीबी, डीएसबी, पोलीस निरीक्षक तसेच जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी पोलीस अधिकारी, जिल्हयाचे आचारसंहिता पथक, वि.स.म.सं.स्तरावरील विविध पथके (FST, VST, SST, VVT), EEM पथक, जिल्हयातील सर्व सार्वजनिक व खाजगी तसेच सहकारी बँक प्रतिनिधी असे एकूण 1 हजार 154 इतके अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  


जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भारत निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे अधिक काटेकोरपणे पालन व्हावे व‍ निवडणूक प्रक्रिया पारदर्शी व्हावी, यासाठी CVigil या मोबाईल ॲप सोबतच नव्याने ESMS प्रणालीचा वापर करणेचे निर्देश दिले असल्याची माहिती देऊन ESMS प्रणालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणूक 2024 साठी सर्व SST नाक्यावर वेबकास्टींगची व्यवस्था करण्याचे निर्देश आहेत. यामुळे निश्चितच आगामी निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढेल, अशी खात्रीही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी यावेळी व्यक्त केली.  

   

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे व नेमून दिलेल्या कार्यपध्दतीप्रमाणे निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्व आदर्श आचारसंहिता पथके, निवडणूक खर्च सनियंत्रण पथके, सहाय्यक खर्च निरीक्षक, ESMS प्रणाली संबंधी सर्व यंत्रणा, बँकांचे प्रतिनिधी डी.एल.बी.सी. यांच्या कार्यपध्दतीविषयी मार्गदर्शन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने MCC, EEM, FST, VST, SST, VVT या सर्व पथकांची  कार्यपध्दती व जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करणेत आले. 


 निवडणूक प्रशिक्षण व्यवस्थापन नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो)   विजया यादव यांनी मार्गदर्शक व सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थी यांचे आभार मानून प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता केली.  

 बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments