Type Here to Get Search Results !

श्रीमंत रामराजेंच्या प्रयत्नातुन फलटण शहराच्या विकासासाठी भरघोस निधी..!

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

श्रीमंत रामराजेंच्या प्रयत्नातुन फलटण शहराच्या विकासासाठी भरघोस निधी..!


 विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने फलटण शहरातील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत  २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून अजून ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर होणार असल्याची  माहीती आमदार दिपकराव चव्हाण यांनी दिली . प्रभाग क्रमांक १० मधील ७ कामे या वैशिष्ट्यपूर्ण निधी मध्ये मंजूर झाली असून प्रभाग क्रमांक १० च्या नागरिकांच्या वतीने श्रीमंत रामराजे , श्रीमंत संजीवराजे , श्रीमंत रघूनाथराजे , आमदार दिपकराव चव्हाण यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.                                   लक्ष्मीविलास पॕलेस येथे  झालेल्या पञकार परिषदेत आमदार  दिपकराव चव्हाण  बोलत होते .यावेळी जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर , श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष पांङूरंग गुंजवटे  यांची प्रमुख   उपस्थिती होती .                                                  पुढे बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की ,  महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकङून वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत  फलटण नगरपरिषदेस २० कोटी रुपयांच्या   निधी आणि कामे  मंजूर करण्यात आली  आहेत. विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी अजित दादा पवार यांनी हा निधी आणि कामे  मंजूर केलेली  असून फलटण शहरातील एकूण ३८ महत्त्वपूर्ण कामे या निधी मुळे मार्गी लागणार आहेत. तर 

 प्रभाग क्रमांक १० मधील ७ कामे या वैशिष्ट्यपूर्ण निधी मध्ये मंजूर झाली असून यामध्ये नाथ मंदिर ते दिलिप पवार घर आणि  हनुमाननगर काळोखेवस्ती पर्यंत पिण्याच्या पाण्याची वितरण नलिका बसवणे, संत बापूदासनगर कमान करणे , सम्राट जनरल स्टोअर शेजारील रस्ता , मंगलताई मठासमोरील रस्ता , बाजारे आणि ङॉक्टर राजवैद्द घरासमोरील रस्सा , अहिंसा मैदानालगतचा रस्ता  कॉंक्रिटिकरण करणे अश्या ७ कामांचे लवकरच शुभारंभ करण्यात येणार आहे.  प्रभाग क्रमांक १० च्या नागरिकांच्या वतीने श्रीमंत रामराजे , श्रीमंत संजीवराजे , श्रीमंत रघूनाथराजे , आमदार दिपकराव चव्हाण यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments