सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/दादा जाधव
वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज- सामाजिक कार्यकर्ते दिलीप (बाबा) पवार .
जागतिक तापमानात झालेले वाढ आणि श्रीमंत रामराजे निंबाळकर यांनी काही दिवसापूर्वी सर्व कार्यकर्त्यांना फलटण तालुक्यामध्ये वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत साखरवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व वृक्षप्रेमी दिलीप बाबा यांनी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले आहे व त्याचे योग्य काळजीही घेत आहेत
साखरवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते दिलीप बाबा पवार वृक्षारोपण स्वखर्चाने करत आहेत व त्याचे योग्य काळजीही घेत आहे विशेषता साखरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात केलेले वृक्षारोपणचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे बाजारपेठेत विशाल मोरे यांच्या हाॅटेल जवळील संवर्धन केलेले वडाचे झाडाचे रोप आज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे
वृक्षारोपण केलेली झाडे जगवून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते दिलीप बाबा पवार यांनी केले आहे
यावेळी बापुराव भोसले,विशाल मोरे,राऊत व इतर उपस्थित होते
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments