सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
सातारा लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन.
शंका व तक्रार निवारणार्थ टोल फ्री 1950 क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा
-उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे.
सातारा दि. 13 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सातारा जिल्हयामध्ये जाहीर झाला असून दिनांक 16 मार्चपासून आचारसंहिता जाहीर करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आचारसंहिता कक्ष, मिडीया सेल, एक खिडकी योजना, टोल फ्री क्रमांक 1950, नामनिर्देशन कक्ष असे विविध कक्ष स्थापन करणेत आलेले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने नागरिकांना काही शंका किंवा माहिती हवी असल्यास किंवा काही तक्रार असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे 24 तास तक्रार निवारण कक्ष स्थापन करणेत आला असून नागरिकांनी आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी टोल फ्री 1950 या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी सातारा यांनी केले आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments