Type Here to Get Search Results !

घरपोडी करणारा गुन्हेगार 24 तासाच्या आत पाचगणी पोलिसांनी केला जेरबंद.

 4:36

<

D

D

b25007ba-cc99-45ef-b91c-10...

Vi5G.]

LTE1

८ :

महाराष्ट्र

सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

घरपोडी करणारा गुन्हेगार 24 तासाच्या आत पाचगणी पोलिसांनी केला जेरबंद.


पाचगणी पोलीसांनी २४ तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणुन घरफोडी चोरी करणारा चोरटा केला जेरबंद . 

दि.०८.०४.२०२४ रोजी सकाळी ०९.०० ते ११.०० वा.चे. दरम्यान यातील फिर्यादी सौ. रेश्मा

श्रीकृष्ण कापसे रा.शाहुनगर पाचगणी ता. महाबळेश्वर जि. सातारा यांचे शाहुनगर पाचगणी येथील

राहते घरामधील बेडरूममध्ये कोणीतरी अज्ञात चोरटयाने प्रवेश करून बेडरूममधील कपाटाच्या

हँडलला अडकवलेल्या लेदरच्या बॅगेमधुन ( १ ) ३६,००० /- रू त्यामध्ये ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे

मणीमंगळसुत्र व (२) २८,००० /- रू त्यामध्ये ७ ग्रॅम वजनाचे सोन्याची बोरमाळ असा १६ ग्रॅम

वजनाचे एकुण ६४,०००/- रू किंमतीचे व वर्णनाचे सोन्याचे दागिने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय

मुद्दाम लबाडीने चोरी करून नेहला आहे. म्हणुन वगैरे मजकुरच्या खबरीवरून पाचगणी पोलीस

ठाणे गु.र.नं. ९२/२०२४ भादवि कलम ३८० प्रमाणे अज्ञात चोरटयाविरूध्द दि.०९.०४.२०२४ रोजी

गुन्हा रजि. दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयातील अज्ञात चोरटयाबाबत तसेच गेले मालाबाबत शोध लागावा याकरीता

गुन्हयाच्या तपासाबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. समिर शेख सो, मा. अपर पोलीस अधीक्षक आंचल

दलाल मॅडम, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. बाळासाहेब भालचिम सो यांनी दिलेल्या

सुचनाप्रमाणे व केलेल्या मार्गदर्शनावरून पाचगणी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. दिलीप

. पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक व तपासी अंमलदार पो.ना. श्रीकांत कांबळे ब. क्र. १२८३ व

पो.हवा.कैलास रसाळ ब. क्र. १३७४, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.ना. तानाजी शिंदे ब.क्र. ९६२ यांनी

गुन्हा उघडकीस येण्याकरीता कसोशिने प्रयत्न करून आरोपी अक्षय बबन पार्टे वय ३० रा. विवर

ता. जावली जि.सातारा यास दि. १०.०४.२०२४ रोजी अटक करून विश्वासात घेवुन त्याच्याकडे

विचारपुस करता त्याने गुन्हयांची कबुली दिलेली आहे. सदर आरोपी याच्याकडुन गुन्हयात चोरीस

गेलेला १०० टक्के मुद्देमाल गुन्हा दाखल झाल्यापासुन २४ तासाच्या आत हस्तगत करण्यात आला

आहे. सदर कारवाईमध्ये पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. दिलीप पवार सहाय्यक पोलीस

निरीक्षक, तपासी अंमलदार पो.ना. श्रीकांत कांबळे ब.क्र.१२८३ व पो.हवा. कैलास रसाळ

ब.क्र.१३७४, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.ना. तानाजी शिंदे ब. क्र. ९६२ यांनी सहभाग घेतला असुन

त्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीबाबत त्यांचे मा. पोलीस अधीक्षक श्री. समिर शेख सो, यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments