Type Here to Get Search Results !

स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची दमदार कारवाई

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची दमदार कारवाई.


धोकादायकरित्या स्फोटक पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या इसमास ताब्यात घेवून

त्याचेकडून स्फोटक पदार्थ, हुंडाई क्रेटा वाहन असा २१,०६,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.

श्री.समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी

लोकसभा निवडणूक प्रक्रिया २०२४ चे अनुशंगाने सातारा जिल्हयात अवैध शस्त्रे, स्फोटक पदार्थ कब्जा

बाळगणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर प्रभावी कार्यवाही करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर

स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या.

पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांचे अधिपत्याखाली

पोलीस अंमलदारांचे पथक तयार करुन त्यांना सातारा जिल्हयात अवैध शस्त्रे, स्फोटक पदार्थ कब्जात बाळगणारे

इसमांची माहिती काढून त्यांचेवर प्रभावी कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.

दिनांक ०९/०९/२०२०२४ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना

त्यांचे विश्वसनीय गोपनिय बाबमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, एक इसम हुंडाई क्रेटा कार क्रमांक

एम.एच.११ डी.एच.१४१५ मधून सातारा ते पुणे जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वरील रायगाव फाटा ता. जावली

जि.सातारा येथे स्फोटक पदार्थाच्या कांडया विक्री करण्याकरीता घेवून येणार आहे, प्राप्त माहितीचा आशय

पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना सांगून नमुद इसमास ताब्यात

घेवून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना त्यांना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने रायगाव फाटा ता. जावली जि.सातारा

येथे सापळा लावून नमुद इसमास त्याचे ताब्यातील हुंडाई क्रेटा कार क्रमांक एम. एच. ११ डी. एच. १४१५ सह

ताब्यात घेवून वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये एकूण ४०० स्फोटक पदार्थाच्या कांडया (नायट्रेट

मिक्चर) मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचेकडून स्फोटक पदार्थाच्या कांडया, हुंडाई क्रेटा व मोबाईल

हॅन्डसेट असा एकूण २१,०६,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याचे विरुध्द भुईंज

पोलीस ठाणे गु.र.नं.१२४ / २०२४ भादविक २८६ सह एक्सप्लोझिव्ह रुल २००८ चा रुल ७१ (१), ९०(१)(३),

एक्सप्लोझिव्ह अॅक्ट १९०८ चे कलम ५ (अ), एक्सप्लोझिव्ह अॅक्ट १९८४ चे कलम ९ ब अन्वये गुन्हा

नोंद

करण्यात आलेला आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे

मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सुधीर पाटील, रोहित

फार्णे, पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, तानाजी माने, पोलीस

अंमलदार यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख

पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments