Type Here to Get Search Results !

बोकड चोरी करणा-या आरोपींच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या


सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

बोकड चोरी करणा-या आरोपींच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या 


लोणंद पोलीस ठाणे हददीत बोकड चोरी झालेबाबत गुन्हा दाखल झालेला होता. सदर

गुन्हयाचे तपासाबाबत मा. पोलीस अधीक्षक साो सातारा समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साो.

आंचल दलाल मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस सो, यांनी सुचना दिल्या होत्या.

त्या प्रमाणे वरीष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरुन लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री. सुशिल भोसले,

सहाय्यक पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर घडणा-या गुन्हयांबाबत

गोपणीय खब-यांमार्फत माहीती मिळवुन मिळाले माहीतीचे आधारे यातील आरोपी निष्पन्न केले.

दिनांक ०६/०४/२०२४ रोजी यातील आरोपी हा कापडगाव ता. फलटण परीसरात फिरत

असल्याची खात्रीशीर माहीती मिळताच मा. वरीष्ठ अधिकारी सो. यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुशिल

भोसले, सहायक पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका आरोपींस ताब्यात घेवुन पोलीस

स्टेशनला आणले. त्यांचेकडे अधिक विचारपुस केली असता त्यांने व त्याचे दोन अल्पवयीन असणा-या

साथीदारांनी तसेच आणखी एक साथीदार यांनी मिळुन लोणंद गावचें हद्दीत घाडगेमळा, ता. खंडाळा

येथील एक बोकड चोरी केलेची कबुली दिली असुन चोरी करतेवेळी गुन्हयात वापरलेली यामाहा

कंपनीची एफझेड मोटारसायकल अशी एकुण ४०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यातआला आहे.


सदर गुन्हयाचा तपास मा.पोलीस अधीक्षक सो सातारा समीर शेख, मा. अप्पर पोलीस

अधीक्षक साो. आंचल दलाल मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी साो. राहुल धस यांचे

मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशिल भोसले, गुन्हे

प्रकटीकरण पथकाचे पोहवा. संतोष नाळे, सर्जेराव सुळ, विठ्ठल काळे, केतन लाळगे तसेच पोहवा.

संजय बनकर यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असुन मा. पोलीस अधिक्षक सो सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments