सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
फलटण लोणंद रोडवर ट्रॅक्टरच्या अपघातात 28 वर्षीय युवकाचा मृत्यू.
दि.19/04/24 रोजी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास फलटण लोणंद रोडवर तांबमाळ नजीक हॉटेल महाराजांच्या समोर ट्रॅक्टर क्र.MH12-QT-1088 व त्यास जोडलेली ट्रॉली क्र.MH12-GN-9749 हे वाहन शिंगणापूरच्या दिशेने कावडीतील बैलांचा चारा घेऊन जात असताना ट्रॅक्टर ड्रायव्हर अनंत जयवंत पांढरे रा.बेलसर ता. पुरंदर जि. पुणे याने चुकीच्या पद्धतीने ट्रॅक्टर चालवल्यामुळे मयत विकास सुदाम जगताप वय 28 वर्षे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
ह्या सदर घटनेची फिर्याद सुदाम नारायण जगताप वय 63 वर्षे रा. बेलसर ता. पुरंदर जि. पुणे याने फलटण शहर पोलीस ठाण्यात दिलेली आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments