Type Here to Get Search Results !

स्थानिक गुन्हे शाखा सातारा व गुन्हे प्रकटीकरण विभाग कराड शहर पोलीस ठाणे यांची कारवाई.

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

स्थानिक गुन्हे शाखा सातारा व गुन्हे प्रकटीकरण विभाग कराड शहर पोलीस ठाणे यांची कारवाई.


पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून घरफोडीचे ३ गुन्हे उघड करुन ५२ तोळे

(अर्धा किलो) वजनाचे सोन्याचे दागिने, चालु बाजारभावाप्रमाणे ३६, ४०,००० /- रुपये व

५,५०,०००/-रु.किं.चे वाहन असा एकुण ४१,९०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

दिनांक ३०/३/२०२४ रोजी सकाळी ०६.०० ते दिनांक ०१/४/२०२४ रोजीचे १८.०० वा. चे

दरम्यान शिवाजीनगर हौसिंग सोसायटी कराड येथील फिर्यादी यांचे घरात अज्ञात चोरटयांनी घराची

खिडकी उचटकुन खिडकीचे गज कापून आत प्रवेश करुन ३७,९४,०००/- रुपये किंमतीचे

सोन्याचांदीचे दागिने चोरी केले होते. सदर बाबत कराड शहर पोलीस ठाणे गुरनं ५१७ / २०२४

भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये दिनांक २/४/२०२४ रोजी गुन्हा नोंद करण्यात आलेला

आहे.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल

दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग

कराड,यांनी गुन्हयाच्या घटनास्थळी भेट दिली. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा यांनी पोलीस

निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील कराड शहर

पोलीस ठाणे यांना गुन्हयातील अज्ञात आरोपींबाबत माहिती प्राप्त करुन गुन्हा उघड करण्याच्या सूचना

दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, रोहित फार्णे,

पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व गुन्हे प्रकटीकरण विभाग कराड शहर पोलीस ठाणे कडील पतंग

पाटील यांच्या अधिपत्याखाली तपास पथके तयार करुन त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या

सूचना दिल्या.

तपास पथकांनी गुन्हयाच्या घटनास्थळी वेळोवेळी भेटी देवून फिर्यादी, साक्षीदार व आजुबाजूच्या

लोकांच्याकडे कौशल्याने तपास केला, घटनास्थळ परिसरात तांत्रिक तपास करुन गोपनिय माहितीच्या

आधारे सदर गुन्हा करताना आरोपींनी वापरलेल्या वाहनाचा क्रमांक प्राप्त केला. सदर वाहनाची

पडताळणी केली असता सदरचे वाहन पोलीस अभिलेखावरील आरोपी रमेश महादेव कुंभार रा. कशेळी

ता. भिवंडी जि.ठाणे याचे असल्याचे निष्पन्न झाल्याने तपास पथकांनी ठाणे येथे जावून आरोपीच्या

घराच्या आजुबाजूच्या परिसरात वेषांतर करुन सलग ४ दिवस पाळत ठेवून होते.

दिनांक ६/४/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सदर आरोपी रमेश महादेव

कुंभार हा सातारा बसस्टँन्ड परिसरात असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी तपास

पथकांना सदर आरोपी यास ताब्यात घेवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे

शाखेकडील पथकांनी सदर आरोपी व त्याचे सोबत असणारा इसम निलेश शामराव गाढवे रा. बनवडी

ता. कोरेगांव जि. सातारा यांचेसह पकडून ताब्यात घेतले व त्यांच्याकडे कसोशिने तपास केला असता

त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितल्याने त्यांना पुढील कारवाईकरीता कराड शहर पोलीस

ठाण्याच्या ताब्यात दिले. तपासामध्ये सदर आरोपी यांनी नमुद गुन्हयासह फलटण भागात गुन्हे केले

असल्याचे सांगितले असून सदर आरोपी यांच्याकडून घरफोडीच्या गुन्हयातील चोरीस गेलेल्या

सोन्याच्या दागिण्यापैंकी ५२ तोळे (अर्धाकिलो ) वजनाचे सोन्याचे दागिने चालु बाजारभावाप्रमाणे

३६,४०,०००/- रुपयेचे व ५,५०,००० /- रुपये किंमतीचे गुन्हयात वापरलेले वाहन महिंद्रा टी. यु. व्ही.

३०० क्र. एम.एच.४६ बी. ए / ४५१४ असा एकुण ४१,९०,००० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

केला आहे.

माहे नोव्हेंबर २०२२ पासून स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व

इतर चोरी असे एकुण १९२ गुन्हे उघड करुन नमुद गुन्हयांमधील चोरीस गेलेल्या सोन्याच्या

दागिण्यांपैकी ५.५ किलो (साडे पाच किलो) सोन्याचे दागिने. चालु बाजारभावाप्रमाणे

३,८६,४०,०००/- (तीन कोटी घ्याऐंशीलाख चाळीश हजार रुपये ) रुपयेचे हस्तगत केले आहेत.

सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर

पोलीस अधीक्षक सातारा, श्री अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड

यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, कोंडीराम पाटील

पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखा सातारा कडील सहायक पोलीस

निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित

पाटील, कराड शहर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, धनाजी देवकर स्थानिक

गुन्हे शाखा सातारा कडील पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय

कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, अजित कर्णे, अमोल माने,

शिवाजी भिसे, जयवंत खांडके, अमित माने, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, प्रविण कांबळे, स्वप्नील

कुंभार, अजय जाधव, अमित झेंडे, ओमकार यादव, मोहन पवार, अरुण पाटील, विक्रम पिसाळ,

विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, स्वप्नील दौंड, मयूर देशमुख, वैभव

सावंत, शिवाजी गुरव, दलजीत जगदाळे, विजय निकम. कराड शहर पोलीस ठाण्याकडील अंमलदार

अमित पवार, शशिकांत काळे, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल

देशमुख, संग्राम पाटील, महेश शिंदे, महेश पवार सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी

व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस

अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments