सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
लोकसभा निवडणूक प्रक्रिया २०२४ सुरळीत पार पाडण्याकरीता सातारा जिल्हा पोलीस दल सज्ज.
सातारा शहरातील मोती चौक येथे जातीय दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक सादर.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा
यांनी लोकसभा निवडणूक प्रक्रिया २०२४ निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचे अनुशंगाने सातारा
जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता विविध उपाय योजना आखलेल्या आहेत.
जिल्हा पोलीस दलामध्ये पोलीस मुख्यालय या ठिकाणी जलद प्रतिसाद पथक (RCP) कार्यान्वित
आहे. पोलीस मुख्यालयामध्ये असणाऱ्या जलद प्रतिसाद पथक ( RCP) अधिक सक्षम बनविण्याकरीता
केंद्रिय जलद कृती दलास (Central Rapid Action Force) पाचारण करण्यात आले होते. केंद्रिय जलद
कृती दलाचे पोलीस निरीक्षक राजकुमार सिंह व त्यांचेकडील जवान यांनी सातारा पोलीस दलातील जलद
प्रतिसाद पथकास (RCP) अचानकपणे उद्भविलेल्या जातीय दंगल / दंगा काबू करण्याचे ७ दिवसाचे
प्रशिक्षण दिलेले आहे. या प्रशिक्षणामुळे जलद प्रतिसाद पथकाची (RCP) कार्यक्षमता वाढली असून
भविष्यात त्यांचेकडून चांगल्या दर्जाची कारवाई होणार आहे, या प्रशिक्षणाचाच एक भाग म्हणून आज
दि.२०/०४/२०२४ रोजी सकाळी १०.५५ ते १२.१० वा. दरम्यान सातारा शहरातील मोती चौक या ठिकाणी
जलद प्रतिसाद पथकाने (RCP) जातीय दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक सादर केले, या प्रात्यक्षिका दरम्यान
१ हॅन्ड गिनेड व १ गॅसगन सेलचा वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये ३ राखीव पोलीस निरीक्षक व
६८ पोलीस जवान हजर होते. जलद प्रतिसाद पथकास (RCP) प्रशिक्षण देण्याचा उद्देश असा आहे की,
लोकसभा निवडणूक प्रक्रिया २०२४ ही निर्भीडपणे पार पाडण्यासाठी या पथकाचा वापर करण्यात येणार
आहे. तसेच सातारा जिल्हयामध्ये अचानकपणे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर उद्भविलेल्या
कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीची चांगल्या / प्रभावणीपणे हाताळण्याकरीता करण्यात येणार आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक
तारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अतुल सबणीस पोलीस उपअधीक्षक (गृह), पोलीस निरीक्षक अरुण
। कर स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस निरीक्षक रविंद्र सावंत्रे शाहुपूरी पोलीस ठाणे, राखीव पोलीस
नरीक्षक बाळू आलदर, पोलीस निरीक्षक राजकुमार सिंह रॅपिड अॅक्शन फोर्स, सहायक पोलीस निरीक्षक
अभिजीत यादव सातारा शहर वानिशा, ३ राखीव पोलीस उपनिरीक्षक, १० कवायत निर्देशक, ९० पोलीस
अंमलदार तसेच ५ पोलीस वाहने जातीय दंगा काबू योजनेच्या प्रात्यक्षिकास हजर होते.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments