सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि.२१/०४/२४ ते ५/०५/२४ पर्यंत कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने खालील अधिकार प्रदान.
विषय : मुंबई पोलीस अधिनियम १९५१ ( सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम २०१४ चे कलम ३६
आ देश :-
ज्या अर्थी दिनांक २१/०४/२०२४ रोजी महावीर जयंती दिनांक २३/०४/२०२४ रोजी हनुमान जयंती हे सण / उत्सव साजरे
होणार आहेत तसेच लोकसभा - २०२४ अनुषंगाने मा. निवडणूक आयोगाने आदर्श आचार संहिता जारी केली आहे. नमुद सण / उत्सवाच्या
निमित्ताने सातारा जिल्हयात विविध कार्यक्रम, मिरवणूकांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे तसेच आचारसंहितेचे तंतोतंत पालन होणे
आवश्यक आहे. तसेच या संबंधाने वाहनांच्या वाहतुकीचे नियमन करणे मिरवणूकीच्या मार्गासंबंधाने व मिरवणूकीतील व्यक्तींचे वर्तन कसे
असावे तसेच ध्वनी प्रदुषणाच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधाचे पालन होवून लाऊड स्पिकरचा वापर योग्य प्रकारे
व्हावा याकरीता निर्बंध घालणे आवश्यक आहे.
अर्थी या कालावधीत कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तासाठी कर्तव्यावर नेमण्यात आलेल्या सर्व संबंधीत पोलीस
अधिकारी व त्यांचेहुन वरीष्ठ पोलीस अधिकारी यांना मुंबई पोलीस अधिनियम १९५१ ( सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम
२०१४ चे कलम ३६ नुसारचे अधिकार प्रदान करणे जरुरीचे आहे.
त्या अर्थी मी, समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, मला मुंबई पोलीस अधिनियम १९५१ ( सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस
अधिनियम २०१४ चे कलम ३६ नुसार असलेल्या अधिकाराचा वापर करुन दिनांक २१/०४/२०२४ ते दिनांक ०५/०५/२०२४ या
कालावधीकरीता कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तासाठी नेमलेले सर्व संबंधीत पोलीस अधिकारी व त्यांचेहुन वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना
खालील प्रमाणे अधिकार प्रदान करीत आहे.
अ) रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणूकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांनी वागणूक किंवा
वर्तणुक कशी ठेवावी, या विषयी निर्देश देणे.
ब) अशा कोणत्याही मिरवणूका या कोणत्याही मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित
करणे.
क) सर्व मिरवणूकींच्या व जमावाच्या प्रसंगी व उपासनेच्यावेळी व कोणत्याही रस्त्यावरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक
स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होऊ न देणे यासाठी योग्य ते आदेश
देणे.
ड) सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर सर्व धक्क्यांवर किंवा धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व
उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश
देणे.
इ) कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविणे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्य वाजविणे
यांचे विनिमयन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे.
ई) कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये
म्हणून ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पिकर) उपयोग करणेचे विनियमन करणे, व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देणे.
फ) सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांचे कलम ३३, ३५, ३७ ते ४०, ४२, ४३ व ४५ या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास
अधिन असलेले व त्यास पष्टी देणारे योग्य ते आदेश देणे...
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments