सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
लोणंद पोलिसांनी 50 हजार रुपये किमतीचा गुटका केला हस्तगत.
वाठार बु.ता.खंडाळा येथे लोणंद पोलीसांनी केली गुटख्याची कारवाई
दिनांक २७/४/२०२४ रोजी १९.३६ वाजण्याचे सुमारास लोणंद पोलीस ठाणे अधिकारी
श्री सुशिल बी. भोसले, पोहवा ४७३ भोसले, पोहवा धनाजी भिसे असे पोलीस ठाणेकडील शासकिय
वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना सहायक पोलीस निरीक्षक सुशिल बी. भोसले यांना बातमीदारामार्फत
माहीती मिळाली की, विशाल चंद्रकांत गाढवे रा. वाठार बु. ता. खंडाळा याने त्याचे घराचे शेजारी असलेल्या
शेडमध्ये अवैदय रित्या गुटख्याचा साठा करुन ठेवला आहे त्या बातमीचे आधारे विशाल चंद्रकांत गाढवे रा.
वाठार बु. ता. खंडाळा यांचे घराचे पश्चिम बाजुस असले पत्राचे शेडमध्ये अचानक २१.१५ वाजता छापा
टाकला तेथे विशाल चंद्रकांत गाढवे वय ४१ रा. वाठार बु. ता. खंडाळा हा मिळुन आला. सदर शेडची
झडती घेतली असता शेडमध्ये कुरकुरेच्या पुढयांचे खालील बाजुस लपवुन ठेवलेल्या सात लहान मोठया
गोणीमध्ये ४९९५२/- रुपये किंमतीचे गुटखा मिळुन आला आहे. सदर बाबत लोणंद पोलीस ठाणे
भा.द.वि.सं. का. कलम ३२८, १८८, २७२, २७३ तसेच अन्न सुरक्षा व मानक कायदा २००६ चे कलम
२६(२)(f), २६(२)(ii), २६ (२) (iv), २७ (३) (d) ३८ (२) (a) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन
त्यामध्ये विशाल चंद्रकांत गाढवे रा. वाठार बु. ता. खंडाळा यास अटक करण्यात आले असुन त्यास
खंडाळा न्यायालयासमोर हजर केले असता त्याची दिनांक २९.०४. २०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी
घेण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. आचल दलाल अपर पोलीस
अधीक्षक सातारा, श्री.राहुल रा. धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद
पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री सुशिल बी. भोसले सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार नितीन
भोसले, धनाजी भिसे, महिला पोलीस प्रिया नरुटे यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
.jpg)
Post a Comment
0 Comments