Type Here to Get Search Results !

गुन्हेगार संतोष पाटोळे व सुधीर माने यांना चार महिण्याकरीता तडीपार .

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

गुन्हेगार संतोष पाटोळे व सुधीर माने यांना चार महिण्याकरीता तडीपार .


वडुज पोलीस ठाणे जि. सातारा यांची तडीपारच्या दोन कारवाया 

श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व मा. आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक, यांनी

आगामी लोकसभास निवडणुकीचे अनुषंगाने सातारा जिल्हातील सराईत गुन्हेगारावर कठोर व प्रभावी

कारवाई करण्याबाबत जिल्हातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा

सातारा यांनी सुचना दिलेल्या आहेत.

सातारा जिल्हातील वडुज पोलीस ठाणे हद्दमध्ये राहणारे दोन सराईत गुन्हेगार सुधीर तानाजी

माने रा.नढवळ ता.खटाव व संतोष ऊर्फ पिंटया हमणंत पाटोळे रा. पेडगाव ता. खटाव वडुज परिसरामध्ये

आपल्या गुंडगिरीचे जोरावर दहशत गुन्हे करीत होते. त्यामुळे सामान्य नागरीकांमध्ये भितीचे वातावरण

निर्माण झाले होते त्याचेवर अनेक अनक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे वडुज पोलीस ठाणेचे

प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. घनश्याम सोनवणे यांनी म.पो.का कलम ५६ ( १ )(अ) (ब) अन्वये

तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव मा. अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांचे मार्फतीने हद्दपार प्राधिकारण

तथा मा. उपविभागीय दंडाधिकारी माण-खटाव यांचेकडे सादर केला होता. सदर प्रस्तांवाची चौकशी

उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग कॅम्प वडुज यांनी केली होती.

सदर सराईत गुन्हेगार यांचेवर दाखल गुन्हयामध्ये वेळोवेळी अटक करुन तसेच योग्य ती

प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांची गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. तो सातत्याने

वडुज परिसरामध्ये गुन्हे करीत होता. त्याचेवर कायद्याचा कोणताही धाक न राहिल्याने वडुज परिसरामध्ये

सामान्य जनतेमध्ये भितीचे वातारवण तयार होवुन त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत

होती.त्यास हद्दपार प्राधिकरण तथा मा. उपविभागीय दंडाधिकारी माण-खटाव यांचे समोर सुनावणी होवुन

त्यांनी त्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये सुधीर तानाजी माने रा. नढवळ ता. खटाव

माण खटाव तालुक्यातुन दिंनाक २९/०३/२०२४ रोजी तडीपार करण्याचे आदेश पारीत केले आहेत. तसचे

संतोष ऊर्फ पिंटया हमणंत पाटोळे रा. पेडगाव ता. खटाव यास खटाव व माण, फलटण, कोरेगाव तालुक्यातुन

दि.१५/०४/२०२४ रोजी तडीपार करण्याचे आदेश पारीत केले आहेत.

नोव्हेंबर २०२२ पासुन म.पो. का कलम ५५ प्रमाणे २३ उपद्रवी टोळयामधील ७५

इसमांना,म.पो.का कलम ५६ प्रमाणे २४ इसमांना म.पो.का कलम ५७ प्रमाणे २ इसमांना असे एकुन

१०१ इसमाविंरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असुन भविष्यात हि सातारा जिल्हामधील

सराईत गुन्हेगारांचे विरुध्द हद्दपार, मोक्का, एम पी डी ए, अशा प्रकारच्या कठोर कारवाया करण्यात येणार

आहे.

याकामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा

व मा.आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक, आश्विनी शेंडगे उपविभागिय पोलीस अधीकारी दहिवडी विभाग

कॅम्प वडुज,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर, वडुज पोलीस ठाणेचे प्रभारी

घनश्याम सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हवा अमित सपकाळ, वडुज पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार

सागर बदडे, सत्यवान खाडे, विद्या जाधव यांनी केली आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments