Type Here to Get Search Results !

फलटण शहर पोलिसांनी हरविलेले १५ मोबाईल फोन नागरिकांना परत दिले.


 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

फलटण शहर पोलिसांनी हरविलेले १५ मोबाईल फोन नागरिकांना परत दिले.


सन २०२२ पासुन अलीकडील कालावधी पर्यंत फलटण शहरामध्ये अनेक नागरिकांचे मोबाईल फोन गहाळ / हरविल्याच्या घटना घडल्या आहेत.

फलटण शहर पोलीसांकडुन मा. पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, सातारा आणि मा. श्री राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोबाईल फोनची शोध मोहीम घेण्यात आली.

या मोहीमेंतर्गत  दि. १८/०४/२०२४ रोजी फलटण शहर पोलीस ठाणे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मा. श्री राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग यांच्या हस्ते १५ नागरिकांना त्यांचे हरविलेले / गहाळ झालेले मोबाईल फोन परत देण्यात आले. या मोहीमेत सन २०२२ मध्ये हरविलेला मोबाईल फोन हस्तगत केला. हस्तगत केलेल्या सर्व मोबाईल फोनची किंमत सुमारे रु. २,५०,०००/- आहे.

पोलीसांच्या सदर कामगिरीचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. या पुढेही अशीच कामगिरी फलटण शहर पोलीसांकडुन करण्यात येणार आहे.

गहाळ / हरविलेले मोबाईल फोनचा शोध घेऊन हस्तगत करण्यामध्ये फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोशि. स्वप्नील खराडे यांनी विशेष कामगिरी केली. या मोहीमेत सायबर पोलीस ठाणे, सातारा येथील पोलीस अंमलदारांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments