Type Here to Get Search Results !

सातारा जिल्हा पोलीस दल आयोजित उपक्रम, “संवाद- तक्रारदारांशी”

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/ वैभव जगताप 

सातारा जिल्हा पोलीस दल आयोजित उपक्रम, “संवाद- तक्रारदारांशी”.


गुरुवार दिनांक ०४ एप्रिल २०२४ रोजी सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक,

सातारा, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे

प्रभारी अधिकारी सातारा जिल्हा यांच्या सहभागातून " संवाद तक्रारदारांशी" हा उपक्रम सातारा

जिल्हयातील पोलीस उपविभागीय कार्यालय स्तरावर पार पाडण्यात आलेला आहे.

उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, फलटण या ठिकाणी श्री. समीर शेख, पोलीस

अधीक्षक, सातारा यांनी उपस्थीत राहुन तक्रारदार यांचेशी संवाद साधला. सदर वेळी श्रीमती आंचल

दलाल, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी सदर उपक्रमाचा संपुर्ण जिल्हयाचा आढावा घेतला

त्यावेळी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी / पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सातारा जिल्हा यांनी

उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे ठिकाणी उपक्रमाकरीता हजर राहिले व सातारा जिल्हयातील एकुण

२२१ नागरीकांशी त्यांच्या तक्रारींचे अनुषंगाने संवाद साधलेला आहे. “संवाद तक्रारदारांशी” या

उपक्रमामध्ये एकुण ८५ अर्ज दाखल झालेले आहेत. सदर अर्जाचे चौकशीअंती दखलपात्र गुन्हे - ०३,

अदखलपात्र गुन्हे - ०७, प्रतिबंधक कारवाई- १५, एकुण १६ अर्ज चौकशीकरीता पाठविण्यात आले

असुन उर्वरीत ०४ अर्ज इतर विभागाकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. तसेच एकुण १४ अर्ज दाखल

असुन त्या अर्जाचे चौकशीचे अनुषंगाने सुचना देण्यात आलेल्या आहेत व २६ अर्ज निकाली काढण्यात

आलेले आहेत.

-

“संवाद - तक्रारदारांशी” हा उपक्रम सुरू झाल्यापासुन सन २०२३ मध्ये २२०६ नागरीकांनी

सहभाग घेतला असुन १२२० तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहेत तसेच सन २०२४ मध्ये दि. ०४/०४/२०२४

रोजी पर्यंत १००६ नागरीकांनी सहभाग घेतलेने एकुण ५५४ तक्रारी अर्ज दाखल झाले आहेत. दाखल

सर्व तक्रारी अर्जांची पोलीस विभागामार्फत दखल घेण्यात आलेली आहे.

तसेच सातारा जिल्हयातील पोलीस अधीकारी व अंमलदार यांच्या प्रशासकिय कामाबाबतच्या

तक्रारींच्या अनुषंगाने एकुण ०५ पोलीस अधिकारी व अंमलदार हजर राहुन त्यांनी एकुण ०५ तक्रारी

दाखल केले असुन सदर तक्रारीची दखल घेवुन त्यांचे तक्रारींचे १५ दिवसांमध्ये निपटारा करण्याबाबत

मा. पोलीस अधीक्षक, श्री. समीर शेख यांनी संबंधीतांना सुचना दिलेल्या आहेत.

-

तसेच सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत दर १५ दिवसांनी म्हणजेच महिन्यातील पहिल्या व

तिसऱ्या गुरुवारी १०.०० ते १३.०० या वेळेत “संवाद तक्रारदारांशी” हा उपक्रम राबविण्यात येत

असून सदर उपक्रमामध्ये जिल्हयातील सर्व नागरिक, सैनिक व त्यांचे नातेवाईक यांनी उत्स्फुर्तपणे

सहभागी व्हावे असे आव्हानही सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे. सदर

उपक्रमामुळे तक्रारदार यांचे पोलीस विभागाशी संबंधीत सर्व समस्या त्यांच्या जवळच्या ठिकाणी तात्काळ

सोडविण्यास मदत होणार आहे. त्यामुळे त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा या ठिकाणी वारंवार

जावे लागणार नाही त्यामुळे वेळेचा अपव्ययही होणार नाही.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments