Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा विभाग अंतर्गत फलटण आगार फलटण येथे मतदारांमध्ये मतदान बाबत जनजागृती.

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा विभाग अंतर्गत फलटण आगार फलटण येथे मतदारांमध्ये  मतदान बाबत जनजागृती.


भारत निवडणूक आयोगामार्फत मतदारांमध्ये मतदान बाबत जनजागृती चे विविध कार्यक्रमामार्फत जनजागृती च्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी sveep अंतर्गत काम सुरु आहे

मा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी फलटण सचिन ढोले साहेब, तहसीलदार फलटण डॉ अभिजित जाधव साहेब, श्री एस के कुंभार  सहायक गट विकास अधिकारी फलटण स्वीप पथक प्रमुख शहाजी शिंदे, पूजा  दुदुस्कर  यांच्या मार्गदर्शन खाली sveep अंतर्गत मतदार मध्ये मतदान बाबत जनजागृती काम सुरु आहे

४३ माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने २५५ फलटण (अ.जा ) विधानसभा मतदार संघ येथे मतदारा मध्ये मतदान जनजागृती घेण्यात आला 

यावेळी  मतदारांमध्ये मतदान करण्याबाबतचे संकल्प पत्र माहिती देऊन मतदारांनी मतदान करणे बाबत संकल्प आमचा १००टक्के मतदानाचा पत्र भरून दिले दिनांक ७ मे २०२४ रोजी आपला मतदाना चा हक्क बजावा असे अहवान स्वीप सहायक सचिन जाधव यांनी केले तसेच वोटर हेल्पलाईन अँप बाबत तसेच दिव्यांग मतदारा च्या सोयी सुविधा बाबत माहिती यावेळी त्यानी दिली 

सर्वं मतदारांचे मतदान बाबत मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली 

यावेळी सहाय्यक वाहतूक अधीक्षक  राहुल वाघमोडे, सह वाहतूक निरीक्षक सुखदेव आईवळे फलटण आगार कर्मचारी तसेच मतदार व स्वीप टीम उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121


Post a Comment

0 Comments