Type Here to Get Search Results !

उंच भरारी योजना

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

उंच भरारी योजना...


सातारा जिल्हयातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करुन त्यांच्या

कल्याणासाठी तसेच विकासासाठी समुपदेशन, मानसोपचार, शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार अशा तरतुदी

करणेसाठी उंच भरारी योजना सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सातारा

जिल्हयातील १८ ते ३५ या वयोगटातील युवक, युवती व त्यांचे पालक यांचेशी संवाद साधुन त्यांना त्यांच्या

आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करुन देणे, तसेच त्यांना स्वत:च्या व्यवसायाकरीता कौशल्य

विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

आज दिनांक ०५/०४/२०२४ रोजी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, भोर व अहमदनगर यांचे माध्यमातुन

४५ दिवसांचे प्रशिक्षणाकरीता सातारा जिल्ह्यातुन १. दुचाकी मॅकेनिक, २. चारचाकी मॅकेनिक व ३. असिस्टंट

इलेक्ट्रीशियन, ४. प्लंबिंग, ५. वेल्डींग, ६. हॉटेल मॅनेजमेंट, ७. जनरल डयुटी असिस्टंट या कोर्सचे

प्रशिक्षणाकरीता एकुण ३१ युवक व युवतींना मा. पोलीस अधीक्षक, समीर शेख यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर

सर्व युवकांना वाहनातुन भोर व अहमदनगर येथे प्रशिक्षणाकरीता रवाना केले.

सातारा जिल्हा पोलीस व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन प्रशिक्षण संस्था यांचे संयुक्त विद्यमानाने

१. दुचाकी रिपेअरिंग/ मॅकेनीकल, २. चारचाकी रिपेअरिंग / मॅकेनीकल ३. हॉटेल मॅनेजमेंट, ४. असिस्टंट

इलेक्ट्रीशियन, ५. प्लंबिग, ६. वेल्डींग, ७. जनरल डयुटी असिस्टंट या कोर्सचे प्रशिक्षणाकरीता कोल्हापूर,

भोर जि.पुणे, अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. आजअखेर उंच भरारी

उपक्रमाअंतर्गत एकुण ७३९ युवक व युवतींना प्रशिक्षण व रोजगार प्राप्त झालेला आहे. तसेच या योजनेत

समाविष्ट झालेल्या इतर युवकांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार तसेच त्यांना स्वत:च्या

व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments