Type Here to Get Search Results !

घरफोडी चोरीचे १८, चोरीचे ८ असे एकुण २६ गुन्हे उघड करुन ४०,०५,४००/- रुपये किंमतीचे अर्धा किलो पेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे दागिने जप्त.

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण वैभव जगताप 

घरफोडी चोरीचे १८, चोरीचे ८ असे एकुण २६ गुन्हे उघड करुन ४०,०५,४००/- रुपये किंमतीचे अर्धा किलो पेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे दागिने जप्त.


दिनांक १३/३/२०२४ रोजीचे ११.३० ते सायंकाळी ५.३० वा. चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी

यांच्या बंद घराची कडी कोणत्यातरी हत्याराने तोडून आत प्रवेश करुन घराच्या कपाटातील ९,२९,५००/- रुपये

किंमतीचे, २९ तोळे ६ ग्रॅम वजनाचे, सोन्याचे दागिने व रोख रक्कम तसेच साक्षीदार विजय किशोर पवार यांची

६,०००/- रोख रक्कम चोरुन नेली आहे त्याबाबत सातारा शहर पोलीस ठाणे गुरनं २५१ / २०२४ भादंवि कलम

४५४,३८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हा घरफोडीचा गंभीर स्वरुपाचा असल्याने श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल

दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सदर गुन्हा उघड करण्याच्या सूचना अरुण देवकर पोलीस निरीक्षक

स्थानिक गुन्हे शाखा,सातारा यांना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांनी नमुद गुन्हा उघड

करण्याकरीता सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व अमित

पाटील यांच्या अधिपत्त्याखाली वेगवेगळी विशेष तपास पथके तयार करुन त्यांना गुन्हा उघड करण्याच्या सूचना

दिलेल्या होत्या.

सदर गुन्हयाच्या घटनास्थळी अरुण देवकर पोलीस निरीक्षक व वरील तपास पथकांनी भेटी देवून

घटनास्थळाची पहाणी केली, आजुबाजूच्या लोकांच्याकडे तपास केला. तसेच तांत्रिक विश्लेषनाद्वारे व गोपनिय

बातमीदारा मार्फत अज्ञात आरोपींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान अरुण देवकर पोलीस निरीक्षक

यांना सदर गुन्हा पोलीस अभिलेखावरील आरोपी सुनिल उर्फ सुशिल बबन भोसले रा. रामनगर कटकेवाडी पो. वाघोली

ता.हवेली जि.पुणे याने केला असून तो सातारा येथे असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने, त्यांनी तपास पथकातील

अधिकारी व अंमलदार यांना नमुद आरोपीस ताब्यात घेवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे सपोनि रोहित

फार्णे व विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने नमुद आरोपी यास सातारा येथे पकडून ताब्यात घेतले व त्याच्याकडे कसोशिने

व कौशल्याने तपास करुन त्याच्याकडून सदर गुन्हयासह १२ घरफोडीचे व २ चोरीचे असे एकुण १४ गुन्हे उघड करुन

१९.७ तोळे सोने. चालु बाजारभावाप्रमाणे १३,१९,९००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व गुन्हा करण्याकरीता

वापरलेली हत्यारे एक बोल्ट कटर व स्क्रू ड्रायव्हर असा माल हस्तगत केला.

तसेच तपास पथकांनी पोलीस अभिलेखावरील आरोपी १) रोहन बिरु सोनटक्के रा. मुरुम उमरगा

जि.अहमदनगर २) महेंद्र रामाभाई राठोड रा. कुसेगांव दौंड जि. पुणे ३) संदिप झुंबर भोसले रा. वाघोली जि. पुणे ४) दोन

विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून ६ घरफोडीचे व ६ चोरीचे असे एकुण १२ गुन्हे उघड करुन

नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालापैंकी चालु बाजारभावा प्रमाणे २४,४५,५००/- रुपये किंमतीचे ३६.५ तोळे

वजनाचे सोन्याचे दागिने व २,४०,०००/- रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे.

नमुद आरोपी यांच्याकडून स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी घरफोडीचे १८, चोरीचे ८ असे एकुण २६ गुन्हे

उघड करुन चालु बाजार भावाप्रमाणे ३७,६५,४००/- रुपये किंमतीचे ५६.२ तोळे सोन्याचे दागिने व २,४०,०००/-

रुपये रोख रक्कम असा एकुण ४०,०५,४००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

माहे नोव्हेंबर २०२२ पासून स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, इतर चोरी

असे एकुण १८९ गुन्हे उघड करुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यापैकी ४ किलो ९८२ ग्रॅम

वजनाचे ३,१०,८६,१००/- (तीन कोटी, दहा लाख, शहयांशी हजार, शंभर रुपये ) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

केला आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments