Type Here to Get Search Results !

सातारा पोलीसांची धडाकेबाज कारवाई माहे नोंव्हेबर २०२२ ते आज अखेर एकूण १०७ इसमांना सातारा जिल्हयातून केले हद्दपार

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

सातारा पोलीसांची धडाकेबाज कारवाई माहे नोंव्हेबर २०२२ ते आज अखेर एकूण १०७ इसमांना सातारा जिल्हयातून केले हद्दपार.




श्री. समीर शेख, भा.पो.से. पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीम. आँचल दलाल, भा.पो.से. अपर पोलीस अधीक्षक,

सातारा यांनी सातारा जिल्हयातील मालमत्तेच्या व शरीराविरुध्दच्या अभिलेखावरील गुन्हेगारांवर कडक कारवाई

करणेबाबतच्या सुचना सातारा जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे

जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनला शरीराविरुध्द व मालमत्तेचे गुन्हे करणा-या सराईत गुन्हेगारांचे गुन्हे अभिलेख तयार करुन

त्यांचेवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करुन त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्याची विशेष मोहिम हाती घेण्यात आलेली

आहे.

सदर मोहिमेअंतर्गत भुईज पोलीस ठाणे हददीत शरीराविरुध्द गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार नामे १) यशवंत भिकु

इथापे वय - ५८ वर्ष, रा. देगाव, ता. वाई, जि. सातारा याचेवर गर्दी, मारामारी, सर्वसामान्य लोकांना शिवीगाळ / दमदाटी

सारखे ७ गुन्हे दाखल होते. त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्हयात प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याच्या गुन्हे करण्याच्या

प्रवृत्तीत बदल होत नव्हता. त्यांचेमुळे देगाव तसेच आसपासच्या परीसरातील लोकांना मोठया प्रमाणावर उपद्रव होत होता,

त्याची गावात दहशत निर्माण झाली होती तसेच मालमत्तेच्या गुन्हयातील अट्टल गुन्हेगार नामे २) लक्ष्मण सुदाम चव्हाण, वय

४६ वर्ष रा. सुरूर ता. वाई, जि. सातारा याचेवर चोरी, घरफोडी यांसारखे ५ गुन्हे दाखल असलेने त्याच्यापासुन लोकांच्या

जंगम मालमत्तेस धोका निर्माण झाला होता, त्याची सुरुर परिसरात मोठी दहशत होती. त्याचेवर देखील कायदेशीर कारवाई

करुन तसेच प्रतिबंधक कारवाई करुन त्याच्या वागण्यात काहीही बदल होत नसल्याने वरील दोन्ही सराईत गुन्हेगार नामे १)

यशवंत भिकु इथापे व २) लक्ष्मण सुदाम चव्हाण यांचेवर सर्वसामान्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.

त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसविण्यासाठी त्यांचेविरुध्द श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा

सातारा यांचे मार्फत प्रस्तावाची छाननी होऊन मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांचे मार्फतीने मा. उपविभागीय दंडाधिकारी,

वाई विभाग वाई यांचेकडे मुंबई पोलीस अधिनियम कलम ५६ प्रमाणे हद्दपार प्रस्ताव पाठवण्यात आला होता.

त्याप्रमाणे मा.उपविभागीय दंडाधिकारी, वाई विभाग वाई यांचेसमोर सदर प्रस्तावाची सुनावणी होवून तसेच श्री.

बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई यांचे मार्फत प्रस्तावाची चौकशी पुर्ण झाल्यानंतर सराईत गुन्हेगार

नामे १) यशवंत भिकु इथापे व २) लक्ष्मण सुदाम चव्हाण यांना मा. श्री. राजेंद्रकुमार जाधव, उपविभागीय दंडाधिकारी, वाई

यांनी दिनांक २४/०४/२०२४ रोजी पासून अनुक्रमे तीन महिने व सहा महिने कालावधी करीता संपुर्ण सातारा

जिल्हयातून हद्दपार केले आहे.

जानेवारी २०२३ ते आज अखेर मागील १ वर्षात भुईंज पोलीस ठाणे हददीतील अवैध दारुची विक्री करणा-या तसेच

अवैध मटका /जुगार चालवणा-या २ टोळयांमधील ६ इसमांना मा. पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस

अधिनियम कलम- ५५ प्रमाणे तसेच शरीराविध्द व मालमत्तेच्या गुन्हयातील सराईत ४ गुन्हेगारांना श्री. राजेंद्रकुमार जाधव,

उपविभागीय दंडाधिकारी, वाई यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ प्रमाणे अशा एकूण १० गुन्हेगारांना सातारा

जिल्हयातून हद्दपार केले आहे.

सातारा पोलीसांनी नोव्हेंबर २०२२ पासून मपोका क ५५ प्रमाणे २४ उपद्रवी टोळयांमधील ७९ इसमांना,

मपोका क ५६ प्रमाणे २६ इसमांना, मपोका क ५७ प्रमाणे २ इसमांना असे एकूण १०७ इसमांविरुध्द तडीपार सारखी

कारवाई करण्यात आली असून भविष्यातही आगामी लोकसभा निवडणुक २०२४ अनुषंगाने सातारा जिल्हयामधील

सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.

श्री. समीर शेख, भा.पो.से. पोलीस अधीक्षक सातारा, श्रीम. आँचल दलाल, भा.पो.से., अपर पोलीस अधीक्षक

सातारा, श्री. बाळासाहेब भालचीम, उप-विभागीय पोलीस अधिकारी, वाई, श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक

सातारा यांचे मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे, पो. उप-नि. विशाल भंडारे, पोलीस

ननाथ बल्लाळ, रविराज वर्णेकर, सागर मोहिते, किरण निंबाळकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार

ळ, प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनु सनस यांनी सदर कारवाई करीता योग्य तो पुरावा सादर केला आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments