सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
फलटणमध्ये दरारा असावा परंतु दहशत नसावी -श्रीमंत रघुनाथराजे
दि.२३ एप्रिल रोजी फलटण येथे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण मधील दहशतीचा बिमोड करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेले आहे व कार्यकर्त्यांना जो काही पाच वर्षात त्रास झाला आमच्या कार्यकर्त्यांच्यावर खोट्या केसेस खोटे गुन्हे दाखल केले गेले या गोष्टी आम्ही आता सहन करू शकत नाही या रामनगरी मध्ये इथून पुढे असली दहशत खपवून घेतली जाणार नाही.
शरदचंद्रजी पवार साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील व राजे गटाचे कट्टर समर्थक यांच्यासारखे आशीर्वाद देणारे दिग्गज मंडळी आपल्या पाठीशी असताना आपला विजय निश्चित आहे.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत प्रियालक्ष्मी राजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, विजयराव बोरावके, आमआदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सर्व फलटण शहर व फलटण तालुक्यातील राजे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments