Type Here to Get Search Results !

सातारा पोलिसांनी माहे नोव्हेंबर २०२२ ते आज अखेर तडीपारीचे केले शतक.

सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

सातारा पोलिसांनी माहे नोव्हेंबर २०२२ ते आज अखेर तडीपारीचे केले शतक.





सातारा पोलीसांची धडाकेबाज कारवाई माहे नोव्हेंबर २०२२ ते आजअखेर तडीपारीचे केले शतक

एकुण १०५ इसमांना सातारा जिल्हयातुन केले हद्दपार )

सातारा जिल्हयामध्ये शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे

करणारे टोळी प्रमुख १) आतीष ऊर्फ बाबू राजेंद्र कांबळे, वय २१ वर्षे रा. शिरवळ, ता.खंडाळा, जि.सातारा. २) विशाल

शेखर वाडेकर वय-२३ वर्ष रा. शिरवळ ता. खंडाळा ३) रामा दादा मंडलिक वय २० वर्षे रा. सटवाई कॉलनी, शिरवळ

ता खंडाळा जि. सातारा ४) संजय विजय कोळी वय २१ वर्षे रा. संभाजी चौक, खंडाळा ता. खंडाळा जि.सातारा यांचे

टोळीवर शिरवळ पोलीस ठाणेस खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, घरफोडी चोरी करणे, गंभीर दुखापत

पोचवुन शिवीगाळ दमदाटी करणे, असे गंभीर गुन्हे दाखल असल्याने तसेच सदर टोळीच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा

बसविण्यासाठी शिरवळ पोलीस ठाणेचे तत्कालीन प्रभारी अधिकारी श्री. नवनाथ मदने, पोलीस निरीक्षक, शिरवळ

पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पुर्ण सातारा, पुणे, सोलापुर

जिल्हयातुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर

केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी, श्री राहुल आर धस, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यांनी केली

होती.

सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई

करुनही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. ते शिरवळ परिसरात सातत्याने गुन्हे करीत

होते, त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे शिरवळ तसेच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठया

प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी

होती.

वरील टोळीस मा.समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी

होवुन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पुर्ण सातारा तसेच पुणे, सोलापुर जिल्हयातुन दोन

वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

नोव्हेंबर २०२२ पासुन मपोकाक ५५ प्रमाणे २४ उपद्रवी टोळयांमधील ७९ इसमांना, मपोकाक ५६

प्रमाणे २४ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०२ इसमांना असे एकुण १०५ इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई

करण्यात आली असुन भविष्यातही आगामी लोकसभा निवडणुक २०२४ अनुशंगाने सातारा जिल्हयामधील

सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.

या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक

सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा

सातारा, श्रेणी पोउनि तानाजी माने पो. हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ.केतन शिंदे, म.पो. कॉ. अनुराधा

सणस, शिरवळ पोलीस ठाणेचे पो. हवा सचिन वीर, पोकॉ मंगेश मोझर यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments