सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
पळवुन नेहणे व पोक्सो गुन्हयातील फरारी आरोपीस शिताफीने अटक.
कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची उल्लेखनीय कामगिरी.
कराड शहर पोलीस ठाणे गु. र. नं. 1192/ 2023 भादंविसं. क. 363 मधील दिनांक 31.10.2023 पासुन फरारी
आरोपीत याने दिनांक 30.10.2023 रोजी कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीस अमिष दाखवुन पळवुन नेहलेचा
गंभीर अपराध करुन पोलीसांचे नजरेआड रहात बेमालुमपणे फरार असणा-या आरोपीत याचा शोध घेवुन त्या आरोपीस अटक
करण्याचे आदेश मा. श्री. समीर शेख सो, मा. पोलीस अधीक्षक सातारा, मा. आंचल दलाल मॅडम, मा. अपर पोलीस अधीक्षक
सातारा यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सो कराड विभाग कराड श्री. अमोल ठाकुर सो, कराड शहर पोलीस स्टेशन प्रभारी
वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. के. एन. पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेस दिले होते. त्याप्रमाणे कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे
प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग व पोलीस अंमलदार यांनी सदरहु गुन्हयातील फरारी आरोपीत बज्या उर्फ बजरंग
सुरेश माने, रा. बुधवार पेठ, कराड ता. कराड याची गोपनीय बातमीदार तयार करुन माहीती काढणेचे प्रयत्न सुरु केले होते. दिनांक
02.04.2024 रोजी गोपनीय बातमीदाराकडुन प्राप्त खात्रीशीर बातमीप्रमाणे खातरजमा करता नमुद आरोपीत हा कराड परीसरात
येणार असलेची खात्रीशीर बातमी मिळालेने पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो. कॉ. आनंदा
जाधव, महेश शिंदे यांनी कराड शहरालगत वारुंजीफाटा- पाटण रोड येथे सापळा रचुन थांबले असताना त्यांस पोलीसांची चाहुल
लागलेने तो पळुन जायचे तयारीत असतानाच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस अंमलदार पो. कॉ.
आनंदा जाधव व पो. कॉ. महेश शिंदे यांनी त्यांस पाठलाग करुन शिताफीने पकडले. बज्या उर्फ बजरंग सुरेश माने, वय 30 वर्षे. रा.
बुधवार पेठ, कराड ता. कराड हा नमुद गुन्हे केलेपासुन फरार झाला होता.
सदर फरारी आरोपीस पकडणेची कामगिरी कराड शहर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस
उपनिरीक्षक पतंग पाटील यांनी त्यांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदारांसह केली आहे. फरारी आरोपीची गोपनीय बातमी
दारांकडुन माहीती मिळवुन तपासचक्र फिरवत कसोशीने माहीतीच्या आधारे महिला अत्याचाराच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीत
बज्या उर्फ बजरंग सुरेश माने, रा. बुधवार पेठ, कराड ता. कराड यांस पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचेकडे सखोल
तपास केल्यावर त्याने गुन्हा केलेची कबुली दिली असुन त्यांस अटक करणेस कराड शहर डी. बी. पथकाने यश मिळविलेले आहे.
पुढील कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक श्री. सुभाष फडतरे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. समीर शेख सो, पोलीस अधीक्षक सातारा, मा. आंचल दलाल मॅडम, अपर पोलीस
अधीक्षक सातारा, मा. श्री. अमोल ठाकुर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड व मा. श्री. के. एन. पाटील सो.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे
पोलीस उपनिरिक्षक पतंग पाटील व पोलीस अंमलदार स. फो. रघुवीर देसाई, स. फो. संजय देवकुळे, पो. हवा. शशिकांत काळे,
अमित पवार, पोलीस नाईक कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पोलीस अंमलदार अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे,
आनंदा जाधव, महेश शिंदे, संग्राम पाटील, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे. मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो, अप्पर पो.
अधीक्षक आंचल दलाल मॅडम यांनी कराड शहर पोलीसांचे अभिनंदन केले आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
.jpg)
Post a Comment
0 Comments