सह्याद्री निर्भिड न्यूज
प्रतिनिधी/ तानाजी सोडमिसे
सोमंथळी ता. फलटण येथील ऋतुजा सोडमिसे यांची पंजाब नॅशनल बँकेत निवड.
सोमंथळी तालुका फलटण येथील कु.ऋतुजा सोमनाथ
सोडमिसे यांची पंजाब नॅशनल बँक मध्ये(AFO) एग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर म्हणून निवड झाली आहे.
कु. ऋतुजा सोडमिसे यांची प्राथमिक शिक्षण जि. प .शाळा हनुमंतवाडी (सोमंथळी) येथे झाले आहे.तर माध्यमिक शिक्षण मधोजी हायस्कूल येथे झाले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण मालोजी राजे शेती विद्यालय फलटण येथे झाले. असून महात्मा फुले कॉलेज पुणे येथे त्यांनी बीएससी हॉर्टिकल्चर ची पदवी संपादन केली आहे.
कु. ऋतुजा सोडमिसे यांचे वडील प्राथमिक शिक्षक असून जि. प.शाळा धनगर वाडा बरड येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.या यशाबद्दल कु. ऋतुजा सोडमिसे यांचे अभिनंदन होत आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments