सह्याद्री निर्भिड न्यूज
महाबळेश्वर/चैतन्य दवे
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर मध्ये पोलिसांचा रूट मार्च.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच येणाऱ्या सण उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाबळेश्वर पोलीस ठाणे यांच्या वतीने मुख्य बाजारपेठ,गर्दीचे ठिकाणे,दाट लोक वस्ती तसेच संवेदनशील भागातून रूट मार्च काढण्यात आला.
निवडणूक शांततेत पार पाडावी यासाठी तालुक्यातील प्रत्येक भागावर पोलिसांचे नियंत्रण व लक्ष आहे तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा रुट मार्च काढण्यात आला. यामध्ये महाबळेश्वर पोलीस ठाणे कडील २ अधिकारी, १२ पोलीस अंमलदार, BSF चे १ अधिकारी, २१ अंमलदार यांनी रुट मार्च मध्ये सहभाग घेतला होता.
आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली. यावेळी महाबळेश्वर पोलीस स्टेशनची कर्मचारी उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments