सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
फलटण ग्रामीण पोलिसांनी मोटरसायकल चोरणारा सराईत चोरटा केला जेरबंद.
फलटण ग्रामीण परिसरातून मोटरसायकली चोरी होत आहेत त्याबाबत विशेष पथक नियुक्त करून सदर गुन्हे उघड करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी ग्रामीण पोलिसांना सक्त आदेश दिलेले आहेत त्यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने, पोलीस अंमलदार नितीन चतुरे , श्रीनाथ कदम अमोल जगदाळे हणमंत दडस हे पायी गस्त करत असताना कुरवली येथे पूर्वी रेकॉर्ड वरील गुन्हेगार निखिल सुरेश जाधव वय २५ रा.तावडी ता. फलटण संशयितरित्या मिळाला त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन गु..नंबर 462/24 ipc 379, गु.र.नंबर 463/24 ipc 379, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र. नंबर 35/24 ipc 379 शिरवळ पोलीस स्टेशन गु.र. नंबर22/22ipc 379 हे गुन्हे उघडकीस आले असून त्यात चोरी गेलेल्या 4 मोटरसायकली किंमत 3,20,000/-रुपये अंदाजे ह्या मिळून आलेले आहेत त्यापैकी एक गुन्हा विधी संघर्ष बालका बरोबर केला आहे. तसेच अटक आरोपी हा फलटण शहर पोलीस स्टेशन गु.र. नंबर 203/24 ipc 380 मधील गुन्ह्यामध्ये फरारी आहे . तसेच आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होऊ शकतात.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल ,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.सुनील महाडिक , पो उप निरीक्षक गोपाळ बदने , नितीन चतुरे ,वैभव सूर्यवंशी, संजय अडसूळ, तात्या कदम ,अमोल जगदाळे,हणमंत दडस ,श्रीकांत खरात यांनी केलेली आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments