सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
वाखरी गावामध्ये कलम १४४ प्रमाणे आदेश लागू यात्रेची परवानगी प्रशासनाने नाकारली.
ज्याअर्थी, मौजे वाखरी, ता. फलटण जि. सातारा येथील यात्रेचे अनुषंगाने गावातील दोन्ही गटाचा वाद मिटणेची शक्यता
नाही. वाखरी गावातील यात्रा ही दिनांक ०१/०५/२०२४ ते ०५/०५/२०२४ पर्यंत साजरी होणार आहे. सदर गावात यात्रा
करणेस परवानगी दिलेस दोन्ही गटात वादविवाद होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी वेळोवेळी बैठका घेऊनही गावातील दोन्ही गट हे एकमेकांचे ऐकण्याचे स्थितीत नाही, असे प्रशासनाच्या निदर्शनास आलेआहे.ज्याअर्थी, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दि. १६/०३/२०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागु करण्यात आलेली आहे आणि सदर कारणावरुन एखादा दखलपात्र गुन्हा घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून आदर्श आचार संहितेचा भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे सचिन ढोले, उपविभागीय दंडाधिकारी, फलटण उपविभाग फलटण फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३कलम १४४ अन्वये प्राप्त अधिकारानुसार मौजे वाखरी गावातील दिनांक ०२/०५/२०२४ ते दिनांक ०५/०५/२०२४ पर्यंत होणान्या यात्रेच्या संबंधाने खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश दिलेले आहेत.
१ मौजे वाखरी, ता. फलटण येथील ग्रामदैवत भैरवनाथ देवाची यात्रा दिनांक ०२/०५/२०२४ ते दिनांक ०५/०५/२०२४ या कालावधीत कोणत्याही करमणूक कार्यक्रमास प्रतिबंध करणेत येत आहे.
२ दिनांक ०२/०५/२०२४ ते दिनांक ०५/०५/२०२४ या कालावधीत ग्रामदैवत भैरवनाथ देवाचा छबीना काढण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच काठी मिरवणूक काढणे व काठीला पैसे बांधण्याच्या विधीस प्रतिबंध करण्यात येत आहे.
३ कोणत्याही राजकीय व धार्मिक प्रकारच्या मिरवणूकीस प्रतिबंध करण्यात येत आहे.
४ कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारची रोख रक्कम अथवा वस्तु स्वरुपातील वर्गणी अगर देणगी स्विकारणेस प्रतिबंध करण्यात येत आहे.
५ मौजे वाखरी या गावात दिनांक ०२/०५/२०२४ ते दिनांक ०५/०५/२०२४ या कालावधीत पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमाव करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
६ मौजे वाखरी, ता. फलटण येथील ग्रामदैवत भैरवनाथ देवाची यात्रेनिमित्त देवाची नित्यपुजा, धार्मिक विधी, लग्न परंपरा
याबाबत सर्व आवश्यक ती कार्यवाही मंदिराचे पुजारी यांनी करावी त्याला कोणतीही अडचण नाही.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments