Type Here to Get Search Results !

गळा आवळुन, डोक्यात दगड घालुन खुन केल्याचा गुन्हा ०२ तासात उघड.

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/ वैभव जगताप 

गळा आवळुन, डोक्यात दगड घालुन खुन केल्याचा गुन्हा ०२ तासात उघड.


दहिवडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

दिनांक ०५/०५/२०२४ रोजी पहाटे ०६-०० वा. चे पुर्वी शिरवली ता.माण जि.

सातारा येथील दादा रामचंद्र जगदाळे वय ३५ वर्षे याचा त्याचे राहते घरासमोर अंगणात कोणीतरी

अज्ञात इसमाने, अज्ञात कारणावरुन कशानेतरी गळा आवळुन तसेच त्याचे डोकीत कशानेतरी

मारुन खुन केला असलेबाबतची मधुकर ज्ञानदेव देवकर पोलीस पाटील शिरवली ता. माण यांनी

दिले तक्रारीवरुन दहिवडी पोलीस स्टेशनला गु.र.न. २०३ / २०२४ भा.द.वि.स.क. ३०२ प्रमाणे गुन्हा

नोंद आहे.

नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती

आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस

अधिकारी दहिवडी कॅम्प वडुज यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपीबाबत माहीती काढुन त्यास ताब्यात

घेण्याच्या सुचना सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना दिल्या. त्याप्रमाणे सहायक

पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने हालचाल करुन

दहिवडी पोलीस स्टेशनकडील महीला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे यांचे सोबत तपास पथक

तयार केले.

,

सदर गुन्हयाचे घटनास्थळी दहिवडी पोलीसांनी तात्काळ भेट देवुन घटनास्थळाची

पाहणी करुन घरातील लोकांना झाले प्रकाराबाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की,

पहाटेच्या सुमारास कुत्री जोरजोराने भुकत असलेने मयत याचे वडील घराबाहेर आले त्यावेळी

त्यांना त्यांचा मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसुन आला. व त्याचवेळी त्यांचे घरापुढुन ४ ते ५

लोक पळुन जाताना दिसल्यामुळे त्यांनी घरातील इतर लोकांना उठवले . त्यावेळी घराचे बाहेर

लावलेला बल्ब कोणीतरी काढुन बाजुला ठेवला होता. तसेच मयत याचा मोबाईल त्याच्या जवळ

नव्हता अशी माहीती सांगुन दरोडयासह खुन असा बनाव रचला. परंतु त्यांनी सांगितलेली हकीगत

व घटनास्थळाची परीस्थीती यामध्ये विसंगती तसेच बनाव करत असल्याचा संशय आल्याने

सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह घरात जावुन पाहणी केली असता

मयताचा मोबाईल घरात मिळुन आला. त्यामुळे पुन्हा याबाबत प्रतिप्रश्न केले असता घरातील लोक

उडवाउडवीची उत्तरे देवु लागल्यामुळे त्यांना पोलीसी खाक्या दाखवुन विश्वासात घेवुन गुन्हयाचे

सत्यपरीस्थीतीबाबत माहीती घेतली असता समजले की, सदर मयत व्यक्ती हा दारु पिवुन घरच्याना

वारंवार घाणेरडया शिव्या देत होता. तसेच मयताची वहीनी हिचे चारीत्र्यावर संशय घेवुन तिच्यावर

वाईट नजर ठेवुन होता. तसेच आई वडीलांना मारहाण करणे, दारुसाठी पैसे मागणे, पुतण्याला व

वहीनीला मारुन टाकण्याची धमकी देणे यासारखे प्रकार करत असलेने त्याच्या त्रासाला कंटाळुन

शिरवली गांवचे यात्रेनिमित्त घरी आलेल्या मयताची बहीण, मयताचा अल्पवयीन पुतण्या

यांचेसोबत मयताचे आई वडील यांनी कट रचुन मयत दारु पिवुन येवुन झोपल्यानंतर मयताचे

वडील रामचंद्र ज्ञानु जगदाळे, आई सौ. कुसुम रामचंद्र जगदाळे, मयताची बहीण सौ. शैला

सचिन जाधव, मयताचा पुतण्या अल्पवयीन बालक यांनी संगणमताने मयतास सर्वप्रथम डोक्यात

दगड घातला आणि त्यानंतर त्याने प्रतिकार करायला चालु केल्यानंतर त्याचे हातपाय पकडुन

जनावर बांधण्याच्या दोरीने त्याचा गळा आवळुन निर्घृण खुन केला असलेचे निष्पन्न करुन सदरचा

गुन्हा अवघ्या ०२ तासात उघडकीस आणला आहे.

श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस

अधीक्षक सातारा, श्रीमती अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली

सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, चांदणी मोटे महीला पोलीस उपनिरीक्षक, पोलीस

अंमलदार प्रकाश हांगे, बापु खांडेकर, प्रकाश इंदलकर, विजय खाडे, स्वप्नील म्हामणे, पुनम

रजपुत, महेश सोनवलकर, रामचंद्र गाढवे अजिनाथ नरबट, महेंद्र खाडे यांनी सदरची कारवाई

केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख पोलीस अधीक्षक

सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments