Type Here to Get Search Results !

सुवर्ण स्पर्श फौंडेशनने पुन्हा एकदा जपली सामाजिक बांधिलकी

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

सुवर्ण स्पर्श फौंडेशनने पुन्हा एकदा जपली सामाजिक बांधिलकी.


   रक्तदान हे सर्वोच्च दान असल्याने प्रत्येक व्यक्तीने किमान वर्षातून एकदा तरी रक्तदान करावे जेणेकरून एखाद्या गरजू व्यक्तीला त्याचा फायदा होईल, असे मत सुवर्ण स्पर्श फाउंडेशनच्या अध्यक्ष शबाना पठाण मॅडम यांनी व्यक्त केले.

    एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन या निमित्ताने सुवर्ण स्पर्श फाउंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन ब्लड बँक फलटण या ठिकाणी करण्यात आले. या कार्यक्रमास विविध वयोगटातील रक्तदाते रक्तदानासाठी उपस्थित राहिले होते.

अनेकदा त्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली .या रक्तदान शिबिरामध्ये महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या .

रक्तदान शिबिर पार पाडण्यास फाउंडेशनच्या अध्यक्षा शबाना पठाण मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले .त्याचबरोबर ब्लड बँक , फलटण येथील सर्व कर्मचारी यांनी हातभार लावला .

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments