सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
राजकियदृष्टया गंभीर स्वरूपाचा दरोडयाचा गुन्हा ७२ तासात उघड.
स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची कारवाई.
राजकियदृष्टया क्लीष्ट व गंभीर स्वरुपाचा दरोडयाचा गुन्हा ७२ तासात उघड करुन ३ आरोपींना
जेरबंद, गुन्हयात वापरलेले हत्यार दोन लोखंडी रॉड, चटनी पुड व वाहन तसेच चोरीस गेलेला
५०००/- रुपये किंमतीचा मोबाईल हस्तगत.
दिनांक २७/४/२०२४ रोजी दुपारी २.३० वा.चे सुमारास मौजे गोवे ता.
जि. सातारा गांवचे हद्दीत कोटेश्वर
पुलाजवळ गुन्हयातील फिर्यादी हे सरबत व बर्फगोळा विक्री करीत असताना, काळया रंगाच्या मोटार सायकलवरुन
तोंडाला रुमाल बांधून तीन इसमांनी येवून फिर्यादी यांच्या डोळयास चटणी पुड चोळून 'तु भाजप चा प्रचार करतोस
काय, तुला लय मस्ती आली आहे कार्य असे म्हणत फिर्यादी यास लोखंडी रॉड, कोयत्याने मारहाण करुन गंभीर
जखमी करुन मोबाईल जबरदस्तीने चोरुन घेवून गेल्याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यास गु.र.नं. १९५ / २०२४
भादंवि कलम ३९७ प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हा राजकिय गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व मा. श्रीमती आँचल
दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सदरचा गुन्हा उघड करण्याच्या सूचना अरुण देवकर पोलीस निरीक्षक
स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व अरविंद काळे पोलीस निरीक्षक सातारा तालुका पोलीस ठाणे यांना दिलेल्या होत्या.
त्याप्रमाणे अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांनी विश्वास शिंगाडे पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे
शाखा,सातारा यांच्या अधिपत्त्याखाली एक विशेष तपास पथक तयार करुन त्यांना गुन्हा लवकरात लवकर उघडकीस
आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे तपास पथकाने घटनास्थळाची पहाणी केली, आजुबाजूच्या लोकांच्याकडे व
फिर्यादीकडे कौशल्याने तपास केला व गोपनिय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषनाद्वारे तीन संशईत इसमांची माहिती प्राप्त
केली व त्याद्वारे संशईत इसम रहात असले ठिकाणी सापळा लावून तीन इसमांना कौशल्याने पकडून ताब्यात घेतले.
व त्यांच्याकडे तपास कौशल्याने विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या
ताब्यातून गुन्हयात वापरलेले हत्यार दोन लोखंडी रॉड, सुहाना अंबारी कंपनीची मिर्चीपुड, काळया रंगाची
टि.व्ही.एस. कंपनीची एम. एच. ११ डीके / ५९५४ व जबरदस्तीने चोरलेला ५०००/- रुपये किंमतीचा व्हीवो कंपनीचा
मोबाईल हॅन्डसेट असा माल हस्तगत करुन सदरचा गंभीर व राजकियदृष्टया संवेदनशिल असा गुन्हा ७२ तासाचे आत
उघड केलेला आहे.
सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक
सातारा, यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, अरविंद काळे पोलीस
निरीक्षक सातारा तालुका पोलीस ठाणे. स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज
ताटे, सुधीर पाटील, रोहित फार्णे, अनिल मोरडे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार संजय शिर्के,
विजय कांबळे, अतिश घाडगे, अमोल माने, अजित कर्णे, राकेश खांडके, अजय जाधव, अमित झेंडे, शिवाजी भिसे,
प्रमोद सावंत, स्वप्निल दौंड, केतन शिंदे, दलजीत जगदाळे सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संदीप
आवळे, मालोजी चव्हाण, राजु शिखरे, तुकाराम पवार, किरण जगताप, शिवाजी डफळे यांनी सहभाग घेतला असुन
कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर
पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments