Type Here to Get Search Results !

श्री.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वाहतुकीत फेरबदल.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

 श्री.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वाहतुकीत फेरबदल.


महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३४ प्रमाणे अधिसुचना

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि.०६/०७/२०२४ ते दि.११/०७/२०२४ अखेर सातारा

जिल्हयातुन मार्गक्रमण करणार असुन सदर पालखी सोहळा पुणे जिल्हयातुन सातारा जिल्हयात दि.०६/०७/२०२४

रोजी पाडेगाव, लोणंद येथे प्रवेश करणार असुन त्यानंतर लोणंद, तरडगांव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम

करुन दि.११/०७/२०२४ रोजी सोलापूर जिल्हयात जाणार आहे. सदरचा पालखी सोहळा हा निरा लोणंद

फलटणमार्गे पंढरपुर रस्त्याने जाणार असलेने तसेच पालखी सोहळयात लाखो भाविक सहभागी होणार असल्याने

पालखी जाणारे मार्गावर कोणताही अपघात घडु नये, वाहतुक समस्या निर्माण होवू नये तसेच अनुचीत प्रकार घडु

नये याकरीता मी समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३४ प्रमाणे प्राप्त

अधिकारान्वये पालखी सोहळयातील वाहनांखेरीज व अत्यावश्यक सेवेतील ( पोलीस, रूग्णवाहीका, अग्निशामक

वाहने) खेरीज करून इतर सर्व वाहनांना निरा लोणंद पंढरपूर मार्गावर दि.०६/०७/२०२४ ते दि.११/०७/२०२४

या कालावधीत खाली नमुद केल्याप्रमाणे प्रवेश करण्यास मनाई करीत आहे.

१) दि.०५/०७/२०२४ रोजीचे ०६.०० ते दि.०९/०७/२०२४ रोजीचे २४.०० वा. पर्यंत फलटण येथून पुणे,

निरा, लोणंद कडे जाणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पूणेकडे शिरगांव घाटातून वळविणेत

येत आहे.

२) दि.०५/०७/२०२४ रोजीचे ०६.०० वा. पासून ते दि. ०८/०७/२०२४ रोजी २४.०० वा. पर्यत आदर्की फाटा

येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळयातील येणारे वाहनाखेरीज इतर वाहनांना बंद करणेत येत

आहे.

३) दि.०५/०७/२०२४ रोजीचे ०९.०० पासून ते दि.१०/०७/२०२४ रोजीचे १३.०० वा. पर्यंत लोणंद येथून

फलटणकडे जाणारी वाहतूक आदर्की मार्गे फलटणकडे वळविण्यात येत आहे.

४) दिनांक ०५/०७/२०२४ रोजीचे ००.०० वा. ते दिनांक ०९/०७/२०२४ रोजीचे २४.०० वा. पर्यंत फलटण ते

लोणंद या मार्गावरील वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.

५) दि.०९/०७/२०२४ रोजीचे ००.०० पासून ते दि.११/०७/२०२४ रोजीचे १६.०० वा. पर्यंत फलटण ते नातेपुते

जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.

६) दि.०९/०७/२०२४ रोजीचे ००.०० पासून ते दि.११/०७/२०२४ रोजीचे २४.०० वा. पर्यंत नातेपुते कडुन पुणे

बाजुकडे जाणारी वाहतुक माळशिरस, अकलुज येथून बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.

७) दि.०९/०७/२०२४ रोजीचे ००.०० पासून ते दि.११/०७/२०२४ रोजीचे १६.०० वा. नातेपुते कडुन फलटण

मार्गे साताराकडे जाणारी वाहतुक शिंगणापुर तिकाटणे मार्गे दहीवडी - सातारा अशी वळविण्यात येत आहे.

नातेपुते कडुन पुण्याकडे जाणारी वाहतुक नातेपुते-दहीगाव- जांब - बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत

आहे.

८) दि.०९/०९/२०२४ रोजीचे ००.०० पासून ते दि.११/०७/२०२४ रोजीचे १४.०० वा. पर्यंत नातेपुते - वाई-

वाठारकडे जाणारी वाहतुक शिंगणापुर तिकाटणे-शिंगणापुर - जावली-कोळकी - झिरपवाडी-विंचुर्णी- ढवळपाटी-

वाठार फाटा मार्गे वळविण्यात येत आहे.

९) दिनांक १०/०७/२०२४ रोजी पालखी सोहळा हा फलटण येथुन पुढील बरड मुक्कामी सकाळी ०६.०० वा.

मार्गस्थ होणार आहे. सदर वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होवु नये म्हणुन पालखीतील वाहने फलटण ते

पंढरपुर रोडने बरडकडे जाण्याऐवजी फलटण - दहीवडी चौक - कोळकी शिगणापुर तिकाटणे - वडले-पिंप्रद बरड

अशी वळविण्यात येत आहे.

पालखी सोहळा दरम्यान पालखी मार्गावरील पालखी सोहळयातील वाहनाखेरीज इतर सर्व वाहने पर्यायी

मार्गाने ये-जा करतील याची इतर वाहनधारकांनी नोंद घ्यावी.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments