Type Here to Get Search Results !

हद्दपार आदेशाचा भंग करणारा आरोपी उंब्रज पोलीसांचे ताब्यात.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

 हद्दपार आदेशाचा भंग करणारा आरोपी उंब्रज पोलीसांचे ताब्यात.


दिनांक २४/०६/२०२४ रोजी उंब्रज पोलीस स्टेशनचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक श्री.

रविंद्र भोरे यांना माहिती मिळाली की, गणेश बाळासाहेब कांबळे रा. पेरले ता. कराड यास मा. पोलीस

अधीक्षक साो, सातारा यांचे आदेशाने सातारा जिल्ह्यातून ०२ वर्षा करीता तडीपार करणेत आले आहे.

तो मौजे पेरले ता. कराड गावी आला असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी उंब्रज पोलीस स्टेशनचे

पोलीस अंमलदार पो. हवा. ब. नं. १३२१ संजय धुमाळ, पो. कॉ. ब. नं. १११० थोरात यांना त्यांचेवर

कारवाई करणे बाबत सुचना देण्यात आल्या त्याप्रमाणे पोलीस अंमलदार यांनी दिनांक

२४/०६/२०२४ रोजी १०.०५ वा. चे सुमा. मौजे पेरले ता. कराड गावचे हद्दीत जावून गणेश

बाळासाहेब कांबळे यांची माहिती घेतली असता तो घरी असल्याची माहिती मिळाल्याने त्यास राहते

घरी जागीच पकडून त्यास सातारा जिल्ह्यात प्रवेश करणे बाबत परवानगी आहे का असे विचारले

असता त्याने मी कोणत्याही प्रकारे परवानगी घेतली नाही असे सांगितलेने. त्यावेळी गणेश बाळासाहेब

कांबळे रा. पेरले ता. कराड याने मा. पोलीस अधीक्षक सो, सातारा यांचेकडील आदेश क्र. स्थागुशा

०५/२०२३ म.पो.का. क. ५५/२५८१/२०२३ या आदेशाचे उल्लघंन केले असलेने त्यांचे विरुध्द

उंब्रज पोलीस स्टेशन गु. र. नं. ३३५ / २०२४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२

प्रमाणे कारवाई करणेत आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पो. हवा. १४५४ पवार हे करीत आहेत.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक साो, सातारा श्री. समीर शेख साहेब, मा. अप्पर

पोलीस अधिक्षक साो, आचल दलाल मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो, श्री. अमोल

ठाकुर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, सहा. पोलीस उप उपनिरीक्षक

विवेक गोवारकर, पो. हवा. संजय धुमाळ, पो. कॉ. मयुर थोरात, पो. कॉ. श्रीधर माने, पो. कॉ.निलेश पवार यांनी केली आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments