Type Here to Get Search Results !

सराईत गुन्हेगार कुंदन जालिंदर कराडकर याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

सराईत गुन्हेगार कुंदन जालिंदर कराडकर याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई.


कराड शहर पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगिरी.

कराड शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील कुख्यात गुंडाने कराड शहरात विविध प्रकारचे 10 गुन्हे करुन

त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुनही तो प्रशासन व न्यायालयांचे आदेशाचे उल्लंघन करीत गुन्हे करुन शहरात

दहशत माजवित असलेने त्याचेवर परिणामकारक प्रतिबंधक कारवाई व त्यांस त्याचे गुन्हे करण्याचे सवयीतून परावृत्त

करणेकरीता कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील व त्यांचे सहका-यांनी

मा. पोलीस अधीक्षक सो सातारा मा. श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सातारा मा. श्रीमती आँचल दलाल मॅडम यांचे

मार्गदर्शनाखाली मा. जिल्हादंडाधिकारी सो सातारा मा. जितेंद्र डुडी यांचे कार्यालयांस मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मा.

श्री. अमोल ठाकुर सो यांचे मार्फतीने प्रस्ताव सादर केलेला होता. त्याची चौकशी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण

विभाग पाटण मा. श्रीमती सविता गर्जे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. अमोल ठाकुर सो यांनी करुन प्रस्तावाचे

चौकशी व कार्यवाहीनंतर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द आदेश पारित झाल्यानंतर नमुद इसम हा परागंदा झाला होता.

त्याचा शोध घेवुन त्यांस पुणे येथे ताब्यात घेवुन त्यांस सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये स्थानबध्द करणेत आलेले आहे.

मा. जिल्हादंडाधिकारी सो सातारा यांचे सदर स्थानबध्द आदेशास आजरोजी मा. सचिव सो गृहविभाग,

मंत्रालय, मुंबई यांचेसमक्ष सुनावणी होवुन त्यामध्ये एक वर्षाकरीता कुंदन जालींदर कराडकर, रा. गजानन होसिंग

सोसायटी, कराड याचा स्थानबध्द आदेश कायम केला आहे.

संपुर्ण कोल्हापुर पोलीस परिक्षेत्रामध्ये सातारा जिल्ह्यातुनच सदरची कारवाई करणेत आलेने यामध्येही

कराड शहर पोलीसांनी आघाडी घेतली आहे. सदरचा एमपीडीए प्रस्ताव मंजुर झालेने कराड शहर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील

सराईत गुन्हेगारांच्या आवळण्याचे काम के. एन. पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत.

कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांचा अभिलेख पडताळणीचे काम चालु असुन अशा

प्रकारे कोणी निष्पन्न झालेस यापुढील काळात त्यांचेवरही अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार असलेचा इशारा

वजा आवाहन वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी केले आहे. यापुढील काळातही अशा कारवायांमध्ये

सातत्य ठेवणेत येणार असलेचेही कळविले आहे. या कारवाईमुळे कराड शहरातील गुन्हेगारांची तंतरली आहे.

सदरची कामगिरी मा. जिल्हादंडाधिकारी सातारा मा. श्री. जितेंद्र डुडी सो, मा. समीर शेख सो, पोलीस

अधीक्षक सातारा, मा. आंचल दलाल मॅडम, अपर पोलीस अधीक्षक सातारा, मा. निवासी उपजिल्हाधिकारी सातारा मा. श्री.

नागेश पाटील सो, मा. श्री. अमोल ठाकुर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड व मा. श्री के. एन. पाटील

सो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे मा. श्री. अरुण देवकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा

सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरिक्षक गणेश कडव

पोलीस अंमलदार सहा. पो. उपनिरीक्षक संजय देवकुळे, स्थागुशा पोलीस हवा. अमित सपकाळ, पोलीस अंमलदार आनंदा

जाधव, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे. मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो, अप्पर पो. अधीक्षक आंचल दलाल मॅडम

यांनी कराड शहर पोलीसांचे अभिनंदन केले आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments