सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
स्कूलबस, ऑटोरिक्षा, टेम्पो इत्यादी वाहनातून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो या अनुषंगाने वाहनांची तपासणी.
संपुर्ण सातारा जिल्हयामध्ये जुन महिन्याचे १५ तारखेपासुन सर्व शासकिय व खाजगी
शाळा, कॉलेजेस, महाविध्यालये सुरु झालेली आहेत. त्या अनुषंगाने विध्यार्थी व विध्यार्थीनींना
स्कुलबस, ऑटोरिक्षा, टेम्पो, इत्यादी वाहनांमधुन प्रवास करावा लागत असतो तो प्रवास
सुरक्षित होण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाकडुन दिनांक १८/०६/२०२४ पासुन
स्कुलबस, ऑटोरिक्षा, टेम्पो, इत्यादी विध्यार्थी प्रवास करणारे वाहनांची सुरक्षेच्या दृष्टीने
तपासणी करुन चुकिच्या पध्दतीने होणारी विध्यार्थी वाहतुकीचे वाहनांवर कारवाई करण्यात
येत आहे.
यामध्ये सातारा जिल्हयामध्ये मा. पोलीस अधीक्षक, समीर शेख व मा. अपर पोलीस
अधीक्षक, आंचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधीकारी सातारा, वाई,
फलटण, दहिवडी, कराड, पाटण व कोरेगाव यांचे सुचनेप्रमाणे सर्व प्रभारी पोलीस ठाणे
अधीकारी, वाहतुक नियंत्रण शाखा सातारा, कराड व जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखा सातारा
यांनी एकुण १४४० स्कुलबस, ऑटोरिक्षा, टेम्पो, इत्यादी विध्यार्थी प्रवास करणारे वाहनांची
तपासणी करुन एकुण ८४ वाहनांवर मोटार वाहन अधिनियमाअंतर्गत कारवाया करुन
३७०००/- रुपये दंड करण्यात आलेला आहे.
तरी सर्व शासकिय व खाजगी शिक्षणसंस्थांनी त्याचे शाळा, कॉलेजेस,
महाविध्यालयांमध्ये शिक्षण घेणारे विध्यार्थी व विध्यार्थीनी यांची शिक्षणाचे ठिकाण ते घर अशी
वाहतुक करीत असताना वाहतुक नियमांचे तंतोतंत पालन करुन त्यांचा प्रवास सुरक्षित
करण्याकडे अधिक गांभीर्यपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121


Post a Comment
0 Comments