सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी हिरवा झेंडा दाखवून प्रशिक्षणासाठी शेतकरी केले मार्गस्थ.
मंगळवार, २५ जून २०२४ शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे तांत्रिक मार्गदर्शन देण्याकरिता दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठात बांबू लागवडीबाबतच्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. बांबू लागवडीच्या प्रशिक्षणासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने याआधी पहिल्या टप्प्यात ५५ शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रशिक्षणासाठी दापोली येथे जात आहेत. आज पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी सातारा येथे हिरवा झेंडा दाखवून या प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या शेतकरी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वाहन मार्गस्थ केले. तसेच याप्रसंगी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी त्यांच्याशी संवाद साधून सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी विजय माईनकर यांच्यासह शेतकरी व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments